प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 01:26 PM2019-03-26T13:26:32+5:302019-03-26T13:28:14+5:30
संपत्तीच्या सूचीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढविणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती आहे. पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रूपये इतकी आहे. संपत्तीच्या सूचीमध्ये आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.
प्रकाश आंबेडकर यांच्या बँक आॅफ बडोदा पुण्याच्या दोन शाखेत ७ लाख २ हजार ६0८ रूपये, स्टेट बँक आॅफ इंडिया पार्लमेंट हाऊस १ लाख ९0 हजार, अंजली आंबेडकर यांच्या याच बँकेत ५६ हजार ५४८ रूपये. इंडियन बँकेत १८ हजार रूपये, प्रकाश आंबेडकरांच्या युनियन बँकेत ३0 हजार रूपये, बँक आॅफ बडोदा प्रबुद्ध भारत खात्यात १५ लाख ६४ हजार ४५७ रूपये, सुजात आंबेडकरांच्या बँक आॅफ बडोदा पुणे शाखेत ३७ हजार ५२३ रूपये आहेत.
फिक्स डिपॉझीट २0 हजार इतकी आहे. ३ लाख ३१ हजार ३00 रूपयाचे दागिने, सम्यक कृषी सहकारी संस्थेचे शेअरस २ लाख, प्रकाश आंबेडकर यांच्या जवळ ६0 हजार रूपये रोख रक्कम, अंजली आंबेडकर यांच्याकडे ५0 हजार रूपये आणि सुजात यांच्याकडे १0 हजार रूपये आहेत.