गौरी-गणपतीला शिक्षकांची नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:40+5:302021-09-15T04:26:40+5:30
श्रीपूर : गौरी- गणपतीनिमित्त अनेकांनी फुलांची आरास, मंदिर, विविध कल्पकतेने ऐतिहासिक देखावे तयार केले आहेत. परंतु एका जिल्हा परिषद ...
श्रीपूर : गौरी- गणपतीनिमित्त अनेकांनी फुलांची आरास, मंदिर, विविध कल्पकतेने ऐतिहासिक देखावे तयार केले आहेत. परंतु एका जिल्हा परिषद शाळेत पहिलीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी रुद्र दिगंबर चव्हाण यांनी चक्क गौरी गणपतीच्या आरासमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची नावे दर्शविली आहेत. घरामध्ये गणरायाच्या भोवताली केलेली आरास लक्ष्यवेधी ठरत आहे.
माळशिरस तालुक्यात कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून १५० शिक्षक अहोरात्र ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम करत आहेत. त्यामध्ये शिक्षक समीर लोणकर, शिक्षिका गिरिजा नाईकनवरे, शहजादी काझी व इतर तंत्रस्नेही शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे काम करत आहेत. शिक्षण विभाग पंचायत समिती, माळशिरस आयोजित गौरी गणपती आरास स्पर्धेत रुद्र दिगंबर चव्हाण (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चव्हाणवाडी- महुद,ता.सांगोला) यांनी आनंददायी शाळेतील विद्यार्थी व त्याच्या पालकांनी त्यांच्या घरी केलेली गौरी गणपती आरासमध्ये गौरीच्या भूमिकेत शिक्षिका गिरिजा नाईकनवरे व शहजादी काझी व गणपतीच्या भूमिकेत शिक्षक समीर लोणकर यांना दर्शविले. शिक्षणाची गोडी ऑनलाइन पद्धतीने कशी निर्माण झाली हे दाखविले आहे.
---
फोटो : १४ श्रीपूर