नांदेड-पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस आठवड्यातून चार दिवस धावणार

By Appasaheb.patil | Published: March 19, 2021 01:09 PM2021-03-19T13:09:16+5:302021-03-19T13:09:28+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

The Nanded-Panvel-Nanded Special Express will run four days a week | नांदेड-पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस आठवड्यातून चार दिवस धावणार

नांदेड-पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस आठवड्यातून चार दिवस धावणार

googlenewsNext

सोलापूर - दक्षिण मध्य रेल्वेची अतिरिक्त विशेष गाडी नांदेड-पनवेल विशेष एक्सप्रेस १८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत आठवड्यातून चार दिवस (सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार) धावणार आहे. तसेच पनवेल-नांदेड विशेष एक्सप्रेस १९ ते १ एप्रिलपर्यंत आठवड्यातून चार दिवस (सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार) धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

ही गाडी पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कर्जत आणि पनवेल या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला २, ब्रेकयान २, जनरल १३, स्लिपर २, एसी थ्री टियर १, एसी टू टियर १, एसी प्रथम श्रेणी १ असे २१ डबे असणार आहेत. या गाडीचे सर्व कोच आरक्षित असतील आणि फक्त कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. या गाडीचे आरक्षण १८ मार्च २०२१ पासून दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: The Nanded-Panvel-Nanded Special Express will run four days a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.