नांदुरकरांच्या महालक्ष्मी सोनोग्राफी आणि एक्सरे क्लिनिकचा बार्शीकरांना फायदा : राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 AM2021-02-24T04:24:41+5:302021-02-24T04:24:41+5:30

डॉ. श्रीपाद शिवाजीराव नांदुरकर यांचे महालक्ष्मी सोनोग्राफी आणि एक्सरे क्लिनिकचा आ. राऊत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी डॉ. बी. ...

Nandurkar's Mahalakshmi Sonography and X-ray Clinic benefit Barshikar: Raut | नांदुरकरांच्या महालक्ष्मी सोनोग्राफी आणि एक्सरे क्लिनिकचा बार्शीकरांना फायदा : राऊत

नांदुरकरांच्या महालक्ष्मी सोनोग्राफी आणि एक्सरे क्लिनिकचा बार्शीकरांना फायदा : राऊत

Next

डॉ. श्रीपाद शिवाजीराव नांदुरकर यांचे महालक्ष्मी सोनोग्राफी आणि एक्सरे क्लिनिकचा आ. राऊत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी डॉ. बी. वाय. यादव हे होते. यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, माजी खा. शिवाजीराव कांबळे, प्राचार्य डॉ प्रकाश थोरात, डॉ. श्रीपाद नांदूरकर, माजी नगराध्यक्ष सरलाताई कांबळे, शीतल नांदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बी. वाय. यादव यांनी आपल्या भाषणातून बार्शी हे मेडिकल हब झाले आहे. डॉ. श्रीपाद यांना सोनोग्राफीमधील कामाचा मोठा अनुभव आहे. त्याचा रुग्णांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविकात डॉ श्रीपाद म्हणाले पुण्या-मुंबईप्रमाणेच बार्शी तालुका व परिसरातील रुग्णांनाही अत्याधुनिक सेवा मिळण्यासाठी ५ डी तंत्रज्ञान असलेली अद्ययावत सोनोग्राफी मशिन घेतली आहे़ सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात अशा प्रकाराची अद्ययावत ५ डई तंत्रज्ञानाची सोनोग्राफी मशिन ही पाहिलीच मशिन आहे. भविष्यात एमआरआय आणि सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध करणार असल्याचा मानस व्यक्त केला.

यावेळी शिवाजी कांबळे, नगराध्यक्ष तांबोळी यांनी देखील शुभेच्छा दिल्या. दिवसभरात वैद्यकीय, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईकांनी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन एन. आर. कुलकर्णी यांनी केले तर आभार भूषण नांदूरकर यांनी मानले.

----

सोनोग्राफीचा दांडगाव अनुभव

डॉ़ श्रीपाद यांनी पुण्यात काम करीत असताना मेंदू,मणके, गुडघे,सांधे तसेच गर्भवती मातांच्या सोनोग्राफीचा मोठा अनुभव घेतलेला आहे़. सोनोग्राफी जितकी उत्कृष्ठ तितके आईच्या पोटातील बाळाची दिसण्याची क्लियारिटी ही उच्चतम असणार आहे़ डॉ. श्रीपाद यांच्याकडील फाईव्ह डी तंत्रज्ञानाच्या सोनोग्राफी मशिनची फ्रिक्वेंन्सी रेंज ही जास्त असल्यामुळे सुस्पष्टता जास्त असणार आहे.

---२३बार्शी सोनोग्राफी

Web Title: Nandurkar's Mahalakshmi Sonography and X-ray Clinic benefit Barshikar: Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.