नान्नज, तिऱ्हे, कोंडी अन् बीबीदारफळ संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:18 AM2021-01-14T04:18:57+5:302021-01-14T04:18:57+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी व पाथरी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर हिरज, साखरेवाडी व राळेरास या ग्रामपंचायतींच्या सहा ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी व पाथरी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर हिरज, साखरेवाडी व राळेरास या ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. या तीन ग्रामपंचायतींचे १९ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. याशिवाय एकरुख - तरटगाव दोन, भागाईवाडी व वडाळा प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण ४२ सदस्य बिनविरोध झाले, तर १९४ जागांसाठी ४४२ उमेदवार रिंगणात आहेत.
शुक्रवारी होणाऱ्या मतदानामुळे बीबीदारफळ, तिऱ्हे, कोंडी व नान्नज ही गावे संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत.
---४४ शस्त्र परवाने जप्त
सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४४ शस्त्र परवाने जप्त करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी उपद्रव ठरू नये, यासाठी ३८ व्यक्तिंना १४४ प्रमाणे हद्दपार करण्यात आले आहे. एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, ८६ पोलीस आणि ४५ होमगार्ड आदींची सुरक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
----