करकंबमध्ये नरसाप्पा देशमुख गटाची हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:59+5:302021-01-20T04:22:59+5:30
करकंब ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नरसाप्पा देशमुख व महिला बाल कल्याणच्या माजी सभापती रजनी देशमुख यांचे सासरे मारुती देशमुख या ...
करकंब ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक नरसाप्पा देशमुख व महिला बाल कल्याणच्या माजी सभापती रजनी देशमुख यांचे सासरे मारुती देशमुख या सख्ख्या बंधूंच्या गटात अत्यंत चुरशीने पार पडली. निवडणुकीचा निकाल समजताच कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्तपणे उधळण करून आंनदोत्सव साजरा केला.
विजयी उमेदवार...
आदिनाथ देशमुख, महादेव व्यवहारे, तुकाराम माने, वैशाली देशमुख, कल्पना देशमुख, ज्योती शिंगटे, तेजमाला पांढरे, बाळूबाई खारे, तेजमाला पांढरे, रेखा जाधव, मारुती देशमुख, राहुल पुरवत, बापूराव शिंदे, पांडुरंग नगरकर, संतोष धोत्रे, बिलकीस बागवान, सुनीता हराळे, रेखा गायकवाड यांनी विजय संपादन केला.
आत्मचिंतन करायला लावणारा पराभव...
ग्रामपंचायत निवडणूक नरसाप्पा देशमुख यांचे पुत्र विद्यमान सरपंच आदिनाथ देशमुख यांनी युवकांबरोबर निवडणुकीत उडी घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाच्या जोरावर व जनतेशी असलेल्या थेट सुसंवादाचा फायदा झाल्याचे दिसून आले. तर विरोधी पॅनेलचे प्रमुख मारुती देशमुख यांनी पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत गट, कल्याणराव काळे गट, भालके गटाच्या जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढविताना मारुती देशमुख यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी रजनी देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कामाच्या जोरावर मतदारांपुढे जात होते. शिवाय मारुती देशमुख गटासोबत असलेल्या दिग्गज मंडळींचा मतदारांवर प्रभाव पडला नसल्याने स्पष्ट झाल्याने मारुती देशमुख गटाचा झालेला पराभव त्यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे.