नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:42 PM2018-01-10T15:42:01+5:302018-01-10T15:44:10+5:30

शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे हे खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर होत्या़ यावेळी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिध्देश्वर मंदीरात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या़.

Narayan Rane's cabinet entry is insignificant for us, the spokesperson of Shiv Sena, Nilam, explained in Solapur! | नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती !

नारायण राणे यांचा मंत्रीमंडळ प्रवेशाचा विषय आमच्यासाठी नगण्य आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांची सोलापूरात स्पष्टोक्ती !

Next
ठळक मुद्दे- शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे सोलापूर दौºयावर- शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद- कोरेगांव-भिमा यावर बोलणे गोºहे यांनी टाळले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : नारायण राणे यांचा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश हा आमच्यासाठी नगण्य विषय आहे़ जीएसटी, शेतकºयांची कर्जमाफी हे प्रश्न शिवसेनेच्या रेट्यामुळेच मार्गी लागले आहेत़ भाजप सरकार हे करायला तयार नव्हते अशी टिकाही शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोºहे यांनी सोलापूरात केली़ असल्याचे मत शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार निलम गोºहे यांनी व्यक्त केले़
शिवसेना उपनेत्या व प्रवक्तत्या आमदार डॉ. नीलम गो-हे हे खासगी कार्यक्रमासाठी सोलापूर दौºयावर होत्या़ यावेळी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी सिध्देश्वर मंदीरात आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या़ यावेळी सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला़ यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, शिवसेनेच्या नेत्या अस्मिता गायकवाड, शाहु महाराज शिंदे आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ 
पुढे बोलताना निलम गोºहे म्हणाल्या की, शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष कै़ बाळासाहेबांनी सांगितले होते की, हिंदु भाविकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, त्यांना सुरक्षित दर्शन घेता आले पाहिजे, आणि कुठेतरी श्रध्दा आणि राजकारण यात गल्लत करता कामा नये हाच बाळासाहेबांचा कायम विचार राहिला आहे़ पाणी, स्वच्छता गृह आणि भाविकांचे प्रश्न यावर मागील १७ वर्षापासून मी काम करीत आहे व यापुढेही करीत राहणार आहे़ यावेळी निलम गोºहे यांनी कोरेगांव-भिमा या प्रश्नावर बोलणे टाळले़ 
यावेळी व्यंकटेश नंदाल, अनिल कोंडूर, संजय राठोड, अंकुश राठोड, जय पतंगे, अप्पु खरडे, राजू राठोड, लक्ष्मण जाधव, संदीप राठोड आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ 

Web Title: Narayan Rane's cabinet entry is insignificant for us, the spokesperson of Shiv Sena, Nilam, explained in Solapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.