मोदीबाबा म्हणजे डेंग्यूचा मोठा डास, प्रणिती शिंदेंची वादग्रस्त टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 06:04 PM2018-10-26T18:04:35+5:302018-10-26T18:08:00+5:30
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि
मुंबई - माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सीमा ओलांडली. आपल्या देशात मोदीबाबा डेंग्यूचा सर्वात मोठा डास आला आहे, ज्यामुळे आजार होतोय. त्या डासाचं नाव मोदीबाबा आहे. आता, फवारणी करुन या डासाला पुढच्या वर्षी हाकलून लावायचं आहे, अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी मोदींवर टीका केली.
आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही नाव न घेता टीका केली. तसेच खासदार शरद बनसोडे यांच्यावर टीका करताना, बेवडा खासदार असा उल्लेख केला. काँग्रेस सरकारने केलेल्या कामाची उद्घाटनं भाजपाचे नेते करत आहेत. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना केवळ एकमेकांशी भांडण आणि आपापले गटतट सांभाळणं एवढच काम असल्याचा घाणघातही प्रणिती यांनी केला.
प्रणिती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. मोदींना ना बहिण आहे ना बायको, आई आहे तिलाही फोटोसाठी ते रांगेत उभे करतात. स्वत: जग फिरतात, पण कंधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहात नाहीत. मोदींना खोटं बोलायचीही सवय आहे. 15 लाख रुपयांचं काय झालं ? असा प्रश्नही प्रणिती यांनी उपस्थित केला. तसेच
खोटं बोलण्याची सवय लागली आहे. 15 लाख जमा करुन देतो असं म्हणाले होते, कुठे गेले ते पैसे. नोटाबंदीमुळे सर्वसामन्यांना फटका बसला. मोदींना ना बहिण आहे, बायको आहे ना मुलगी…त्यामुळे त्यांना महिलांना होणाऱ्या त्रासाबद्दल कळणार नाही. आई आहे पण नोटाबंदीवेळी तिला रांगेत उभं केलं ते पण फोटोसाठी. जग फिरतात पण कधी शेतकऱ्यांमध्ये येऊन त्यांची परिस्थिती पाहत नाही’, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं. तसेम मोदीबाबा हे डेंग्यूचा मोठा डास आहेत. यामुळे आजार होऊ शकतो, त्यामुळे पुढच्या वर्षी फवारणी करुन हा पळवून लावायचा आहे, अशी वादग्रस्त टीका प्रणिती यांनी केली आहे.