अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 04:22 PM2020-10-20T16:22:56+5:302020-10-20T16:55:43+5:30

प्रकाश आंबेडकरांचे सल्ला; सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी भागाची केली पाहणी

Narendra Modi is not the Prime Minister of the country, he is an alcoholic; Criticism of Prakash Ambedkar | अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं

अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं

Next

सोलापूर :अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं. टोलवाटोलवी बंद करावी. आधीच लोक कोरोनाने त्रासलेले आहेत. उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतक?्यांना दिलासा द्या. मदत द्या. शेतकºयांच्या असाहयतेवर राजकारण करू नका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदे दरम्यान दिला.

प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांशी संवाद साधत त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आंबेडकरांनी शेतकºयांच्या बांधावरच जाताना गावात जाऊनही घरांची पाहणी केली. तसेच शासनाकडून आलेल्या मदतीचीही विचारपूस केली. पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडूनच कर्ज काढू शकते. इतर कुणाकडून कर्ज घेऊ शकत नाही. त्यामुळे राज्याने केंद्राकडे कजार्ची मागणी केलीय का? याचा आधी खुलासा केला पाहिजे. जर कजार्ची मागणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जोर लावून हे कर्ज मंजूर करून घेतलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले.

नुकसान देण्याची पद्धत ठरलेली आहे. त्याचे निकषही आहेत. राज्य सरकारला आता केवळ मदत जाहीर करायची आहे. शेतकºयांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं संसारोपयोगी साहित्यही वाहून गेलं आहे. त्यांना आधी मदत करा. महिनाभर खावटी द्या, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गावात पाहणीसाठी आलेच नसल्याच्या तक्रारीही गावकºयांनी केल्याचेही आंबेडकरांनी सांगितले़ शेतकºयांना भरघोस नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्य सरकारसोबत चर्चा करू. त्यानंतर काय करायचं त्याची पुढची दिशा ठरवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Narendra Modi is not the Prime Minister of the country, he is an alcoholic; Criticism of Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.