नरेंद्र मोदी बुधवारी सोलापूर दौºयावर, दिल्लीच्या विशेष पथकाकडून सभा स्थळाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:36 AM2019-01-07T10:36:40+5:302019-01-07T10:39:17+5:30
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी होणाºया सोलापूर दौºयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी)कडून पार्क स्टेडियमच्या ...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी होणाºया सोलापूर दौºयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी)कडून पार्क स्टेडियमच्या मैदानाची पाहणी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. इंदिरा गांधी पार्क स्टेडियम ही जागा निश्चित झाल्याने सध्या रंगरंगोटी प्रवेशद्वारी आदींची सजावट केली जात आहे. रविवारी दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी) चे पथक सोलापुरात दाखल झाले होते. या पथकाने पार्क स्टेडियमची बारीक पाहणी केली. नरेंद्र मोदी यांच्या सभेचा स्टेज कोठे असला पाहिजे, त्यांचा प्रवेश कसा होईल, त्यांच्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा व्यवस्था कशी असेल याची माहिती दिली.
पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना दौºयादरम्यानचा पोलीस बंदोबस्त कसा असला पाहिजे याच्या सूचना दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना स्टेडियमबाबत कोणती काळजी घ्यावी लागेल ते सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्या जबाबदाºया पार पाडाव्या लागणार आहेत याची माहिती दिली. विविध सूचना करून त्याप्रमाणे नियोजन करावे, असेही एसपीजी पथकातील अधिकाºयांनी यावेळी सांगितले.
मार्गाची केली पाहणी...
च् दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी) च्या पथकांनी विमानतळ ते इंदिरा गांधी पार्क स्टेडियम या मार्गाची पाहणी केली. पार्क स्टेडियम ते सरस्वती चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाचीही पाहणी केली. मार्गातील अडथळे, वाहतूक व्यवस्था आदी बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना केल्या. एसपीजीचा एक कॅनव्हा या रस्त्यावरून फिरत होता. सर्व मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे.