नरखेड ग्रामपंचायतीने महिला दिनानिमित्त मुलींच्या नावे ठेवली ठेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:22 AM2021-03-10T04:22:58+5:302021-03-10T04:22:58+5:30
नरखेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नरखेड (ता. मोहोळ) ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका ...
नरखेड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नरखेड (ता. मोहोळ) ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वयंसेविका यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील होते. यावेळी ० ते ६ या वयोगटातील मुलींच्या नावावर दोन हजार रुपयांची मुदतठेव बँकेत ठेवण्यात आली.
यावेळी सरपंच बाळासाहेब मोटे, उपसरपंच सुवर्णा जाधव, नूतन ग्रा. पं. सदस्या वैशाली बनसोडे, सविता धोत्रे, ग्रामसेवक तात्यासाहेब नाईकनवरे, सचिन शिंदे, संतोष कोळेकर, सुवर्णा जाधव, विद्या मोटे, रेखा राऊत, सुहास गरड, बापू भडंगे, प्रमोद आतकरे, राहुल कसबे, विनोद पाटील, पांडुरंग राऊत, अशोक धोत्रे, प्रेरणा खंदारे, उज्ज्वला जगताप, पांडुरंग राऊत, आरोग्य सेविका उज्ज्वला व्यवहारे, सुनीता चव्हाण, अशोक धोत्रे उपस्थित होते.
----
०९ नरखेड
नरखेड ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य क्षेत्रातील महिलांचा उमेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.