नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नटराज पॅनलचा दणदणीत विजय

By रवींद्र देशमुख | Published: April 17, 2023 09:16 AM2023-04-17T09:16:50+5:302023-04-17T09:17:39+5:30

रात्री उशिरा निकाल जाहीर: दसरी अन साळुंके यांना सर्वाधिक मते

nataraj panel resounding victory in natya parishad elections | नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नटराज पॅनलचा दणदणीत विजय

नाट्य परिषदेच्या निवडणुकीत नटराज पॅनलचा दणदणीत विजय

googlenewsNext

रवींद्र देशमुख, सोलापूर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियमात मंडळाच्या निवडणुकीत सोलापूरच्या नटराज पॅनलने सर्व सहा जागा मोठ्या मतांच्या फरकाने जिंकून रंगभूमी पॅनलवर दणदणीत विजय मिळविला आहे.

नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सकाळी नऊ वाजता सोलापूर, पंढरपूर, बार्शी आणि सांगोला येथील केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता मतदान संपले. रात्री आठ वाजेपर्यंत मतदानाचे आकडे येथे आल्यानंतर 72.66 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. सोलापूर केंद्रावर नटराज आणि रंगभूमी पॅनेलमध्ये चुरशीने मतदान झाले. क्रॉस वोटिंग होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता, पण दोन्ही पॅनलमधील मतांचा फरक लक्षात घेता तितके क्रॉस वोटिंग झाले नसल्याचे स्पष्ट झाले.

नटराज पॅनलचे  प्रा. अजय दासरे यांनी सर्वाधिक 1547 मते मिळवून विजय संपादन केला. त्यानंतर विजय साळुंखे यांना 1538 इतकी मते मिळाली. मंगळवेढ्याच्या तेजस्विनी कदम आणि पंढरपूरचे दिलीप कोरके यांनी 1495 मते मिळविली. अकलूजचे विश्वनाथ आवड यांना 1493 तर सोलापूरचे सुमित फुलमाबडी यांनी 1373 मते मिळवून विजय संपादन केला. रंगभूमी पॅनलचे चारही उमेदवार साधारण 300 ते 485 इतकेच मते मिळवू शकले. या पॅनलचे अरविंद अंदोरे यांना 296, अनुजा मोडक यांना 331, गुरु वठारे आणि मीरा शेंडगे यांना अनुक्रमे 314 आणि 485 मते मिळाली.

नाट्य परिषदेचे नियामक मंडळ 60 सदस्यांचे असून, दर पाच वर्षांनी हे मंडळ निवडण्यासाठी मतदान होते. यंदा कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि बेळगावी येथील निवडणूक (20 जागा) बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आज राज्यात 40 जागांसाठी निवडणूक झाली. या मंडळातून अध्यक्ष निवडला जातो. यासाठी अभिनेते प्रशांत दामले आणि  प्रसाद कांबळी यांच्यात सामना होत आहे.

नियोजनबद्ध प्रचार

नटराज पॅनलने गेल्या दोन महिन्यांपासून या निवडणुकीसाठी नियोजनबद्ध प्रचार केला. शहरातील प्रमुख सदस्यांना आपल्या बाजूने घेऊन दामले यांच्या बाजूने भूमिका जाहीर केली. दामले आणि किशोर महाबोले यांना बोलावून मेळावे आयोजित केले व मतदारांना साद घातली. सोशल मीडियाचाही प्रभावी वापर केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: nataraj panel resounding victory in natya parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.