नातेपुते नगरपंचायत निवडणूक; मोहिते-पाटील गटाची एकहाती सत्ता; १७ पैकी ११ जागेवर मिळविला विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 01:11 PM2022-01-19T13:11:07+5:302022-01-19T13:11:38+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
राजीव लोहकरे
अकलूज : नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत मोहिते-पाटील (भाजप) गटाच्या जनशक्ती विकास आघाडी पॅनलने १७ पैकी ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
नव्याने स्थापन झालेल्या नातेपुते नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणपेक्षा स्थानिक पातळीवर गटातटात राजकारण रंगले असुन सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक विकास आघाडी करुन निवडणुक लढविली.
भारतीय जनता पार्टीच्या मोहिते-पाटील गटाचे बाबाराजे देशमुख यांनी राजेंद्र पाटील,भांडण व कवितके गटाबरोबर जनशक्ती विकास आघाडीची स्थापन करुन निवडणुक लढवली तर भाजपा मोहिते-पाटील गटाचेच अॅड.बी.वाय.राऊत यांनी दादा उराडे विजय उराडे व प्रविण या गटाबरोबर नागरी विकास आघाडी करुन ही निवडणूक लढवली. तर रासपचे तिस-या पॅनलने निवडणुक लढवली होती.
आज झालेल्या मतमोजणीत बाबाराजे देशमुख प्रणीत जनशक्ती विकास आघाडीने ११ जागी, अॅड.बी.वाय. राऊत प्रणीत नागरी विकास आघाडने ५ जागी तर अपक्ष १ जागी विजयी झाले आहेत.