राष्ट्रीय पक्षीदिन ; वन्यजीव छायाचित्रकारांकडून सोलापूरचे पक्षीवैभव कॅमेºयात कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:57 AM2018-11-12T10:57:06+5:302018-11-12T10:59:37+5:30
यशवंत सादूल सोलापूर : राष्ट्रीय पक्षी दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे पक्षीजीवन कॅमेºयात कैद करण्यासाठी राष्टÑीय पातळीवरील वन्यजीव छायाचित्रकार येथे ...
यशवंत सादूल
सोलापूर : राष्ट्रीय पक्षी दिनाचे औचित्य साधून सोलापूरचे पक्षीजीवन कॅमेºयात कैद करण्यासाठी राष्टÑीय पातळीवरील वन्यजीव छायाचित्रकार येथे दाखल झाले असून, ते परिसरातील पक्षी आपल्या कॅमेºयात टिपत आहेत.
सोलापूरच्या शिवारात विविध प्रकारचे पक्षी विहार करतात, शिवाय फ्लेमिंगोसारखा पक्षी खास पाहुणा म्हणून येथे येतो. या पक्षांचे देशातील पक्षी निरीक्षकांना आणि छायाचित्रकारांना मोठे आकर्षण आहे. या आकर्षणामुळे राष्टÑीय दर्जाचे छायाचित्रकार येथे येऊन छायाचित्रण करीत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने या छायाचित्रकारांबद्दल जाणून घेतले. त्यावर दृष्टिक्षेप.
रामप्पा अनंतमूर्ती : बंगळुरुमध्ये एलआयसी विकास अधिकारी असून भारतातील अनेक अभयारण्यामध्ये त्यांनी पक्षी चित्रण केले आहे़ त्यांच्यामते सोलापूर शिवारातील गवताळ माळरान, तलाव, स्वच्छ व सुंदर आहे़ येथील बारहेड गीज व व्हाईट क्रेनचे उत्तम छायाचित्रण त्यांनी केले.
दिनेशसिंग : यांनी रेडनेक फाल्कनचे दुर्मिळ चित्रण केले असून माळढोकचे दर्शन दुर्मिळ होत चालल्याची खंत त्यांना वाटते़ त्यांच्यामते गवताळ माळरान हे सोलापूरचे वैभव आहे.
डॉ़ प्रदीप राव यांंनी देश-परदेशातील अनेक अभयारण्यात वन्यजीव चित्रण केले आहे़ ते गवताळ भागातील शिकारी पक्षांचे चित्रण करण्यासाठी सोलापुरात आले आहेत़ येथील भटकंतीत मेल क्रिस्टल हा सुंदर पक्षी त्यांनी टिपला आहे.
हुसेन लतीफ : सोलापुरात प्रथमच वन्यजीव चित्रण करण्यासाठी आले. सोलापुरात स्पॉटेड इगल, रेड नेक फाल्कनच्या जोडीच्या चित्रणाने ते तृप्त झाले आहेत.
जतीन चवळे (हैदराबाद): सोलापूरच्या गवताळ माळरानावर शिकारी पक्षांचे चित्रण केल्यानंतर त्यांना मनस्वी आनंद झाला़
---------------
ब्रिटिशकालीन गॅझेटियरमध्ये आढळते नोंद
सोलापूर शिवारात २०० ते २५० प्रजातींच्या पक्षांचे दर्शन घडते़ त्यातील २५ ते ३० दुर्मिळ पक्षी आहेत. सोलापूरच्या पक्षी वैभवाचे ब्रिटिशकालीन गॅझेटियरमध्ये पक्षांसाठी समृद्ध परिसर अशा नोंदी आढळतात़ येथील पक्षी वैभवाची माहिती वन्यजीव छायाचित्रकार डॉ़ व्यंकटेश मेतन यांच्या मार्फत जगभर गेल्याने पक्षीमित्र येथे हजेरी लावतात हे शुभ संकेत आहेत़