सोलापुरातील शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज आज अर्ध्यावर; जाणून घ्या नेमकं कारण...
By Appasaheb.patil | Published: December 17, 2023 02:23 PM2023-12-17T14:23:21+5:302023-12-17T14:23:36+5:30
परपूज्य शेख नवाब अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह कुवैत राज्याचे अमीर यांचे १६ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले.
सोलापूर : भारत सरकारच्या गृह शाखेच्या उपसचिव कार्यालयातील वायरलेस मॅसेजवरून सोलापूर शहरातील मुख्य शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडविण्याबाबतच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या, त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, परपूज्य शेख नवाब अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह कुवैत राज्याचे अमीर यांचे १६ डिसेंबर २०२३ रोजी निधन झाले. त्यामुळे संपूर्ण भारतात रविवार १७ डिसेंबर राेजी एक दिवसाचे शोक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाचे इमारतीवर व ज्या ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तो रविवार १७ डिसेंबर २०२३ रोजी ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावे.
याशिवाय कोणतेही मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊ नये याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार आर. व्ही. पुदाले यांनी पत्र काढले आहे. या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, पेालिस आयुक्त शहर, पोलिस अधीक्षक कार्यालय ग्रामीण, सोलापूर, सह. आयुक्त जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपरिषद, सोलापूर, सर्व मुख्याध्यधिकारी, नगरपरिषद यांनी याबाबतची अंमलबजावणी केल्याचेही सांगण्यात आले.