राष्टÑ सेवादलाचा उपक्रम : कीर्तन, प्रवचन, प्रबोधन गीतांचा समावेश

By Admin | Published: May 11, 2014 12:20 AM2014-05-11T00:20:29+5:302014-05-11T00:20:29+5:30

सामाजिक समतेची दिंडी

National Season Service: Inclusion of Kirtan, discourse, Prabodh Gita | राष्टÑ सेवादलाचा उपक्रम : कीर्तन, प्रवचन, प्रबोधन गीतांचा समावेश

राष्टÑ सेवादलाचा उपक्रम : कीर्तन, प्रवचन, प्रबोधन गीतांचा समावेश

googlenewsNext

पंढरपूर : येथील विठ्ठल मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे, यासाठी साने गुरुजी यांनी केलेल्या उपोषणाची समाप्ती १० मे १९४७ रोजी झाली होती. त्यानिमित्त ‘दिंडी सामाजिक समतेची, लढाई जाती अंताची’ हा निर्धार परिपूर्ण होण्यासाठी महाराष्टÑातील सर्व सेवादल सैनिक टाळ-मृदुंगाच्या गजरात भगवी पताका खांद्यावर घेऊन वाजतगाजत मोठ्या संख्येने समता दिंडी राष्टÑीय सेवा दलाने पंढरपूरमध्ये काढली. समता दिंडीची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या वाड्यापासून (पुणे), महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, ओणी, साखरपा, कोल्हापूर, इचलकरंजी, अब्दुललाट, हेरवाड, कुरुंदवाड, जयसिंगपूर, सांगली, मिरज, सांगोलामार्गे पंढरपूरला आली. प्रत्येक ठिकाणच्या मुक्कामावर सांप्रदायाच्या परंपरेप्रमाणे कीर्तन, प्रबोधन गीतांचा कार्यक्रम झाला. पंढरपूरमध्ये समता दिंडी पोहचल्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून विविध कार्यक्रमास सुरुवात झाली. यामध्ये प्रबोधन गीते, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम झाले. पंढरपूरमध्ये समता दिंडीची सुरुवात खरा तो एकचि धर्म या गातीवर मुलांनी नृत्य करुन केली. या दिंडीत सजीव देखावा, झांज पथक, लेझीम पथक त्याचबरोबर विविध ठिकाणी पथनाट्य व नृत्य सादर करण्यात आले. दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती़ ही दिंडी तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, शिवाजी चौक, नाथ चौक, तांबडा मारुती कालिकादेवी चौक, काळा मारुती चौक व चौफाळा चौक या मार्गावरुन काढण्यात आली. यावेळी राष्टÑीय सेवा दलाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, ह.भ.प. भद्रीनाथ तनपुरे महाराज, दत्तात्रय कोंडलकर, सुधीर खाडे, आबासाहेब नवले, विनोद बागल, अभिजित जानकर, सागर चंदनशिवे, प्रा. अरविंद कपोले, डॉ. अभिजित वैद्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

---------------------

ह.भ.प. भद्रीनाथ महाराज, राजाभाऊ अवसक व प्रा. दत्तात्रय कोंडलकर यांनी भगवा पताकाचा झेंडा उंच करताच ढोल-ताशांच्या गजरात झांज खेळत दिंडीला सुरुवात झाली.

 

Web Title: National Season Service: Inclusion of Kirtan, discourse, Prabodh Gita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.