राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा सोलापुरात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 12:04 PM2021-05-17T12:04:49+5:302021-05-17T12:05:09+5:30
केंद्र सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा-विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
सोलापूर - देशात प्रचंड इंधन दरवाढ झाली आहे गॅस पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले आहेत. महागाई भरमसाठ वाढलेली असताना आज परत केंद्र सरकारने सामान्यांना धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी ११८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंचे पोते ११७५ रुपयांचे होते ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप भाजपच्या केंद्र सरकारने केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात राज्यभरात देशाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे व पक्ष निरिक्षक सुरेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे शेतकरी विरोधी केंद सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे.
याचवेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणााबाजी करण्यात आली. राज्य शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंध नियमांचे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करत राष्ट्रवादीने हे आंदोलन यशस्वी केले व त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
यावेळी भारत जाधव, संतोष पवार, मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, सुभाष पाटणकर, पद्माकर काळे, राजन जाधव, जुबेर बागवान, सुनीता रोटे, आरती हुळ्ळे, चंद्रकांत पवार, वसीम बुराण, जावेद खैरदी,राजू कुरेशी, मिलिंद गोरे, प्रमोद भोसले, गफुर शेख, मोबीन शेख, अनिल उकरंडे, अमीर शेख, तनवीर गुलजार, प्रकाश जाधव, सोमनाथ शिंदे, रुपेश भोसले, अजित पात्रे, प्रवीण साबळे, अनिल बनसोडे, बसू कोळी, संजय पाटील, संजय मोरे,संपन्न दिवाकर, सफल शिरसागर, मुसा आत्तार, मोहम्मद इंडीकर, अमोल कुलकर्णी, संजय सांगळे, जावेद कोतकुंडे, सोपान खांडेकर, सरफराज बागवान, रमीज मुल्ला, अशितोष नाटकर, ज्योतिबा गुंड, सिद्धेश्वर आंबट, नागेश बोराडे, बाळासाहेब मोरे, प्रमोद भोसले, निशांत साळवे, पद्मश्री शिंदे, ओंकार कांबळे, महेश पवार ,सोहेब चौधरी, आनंद कोलारकर, दादाराव रोटे, अनिल उकरंडे, सिया मुलानी, गौराबाई कोरे, मारता असादे, वंदना भिसे, उषा बेसरे, शोभा गायकवाड आदी उपस्थित होते.
आदी पदाधिकारी उपस्थित होते.