राष्ट्रवादी उद्योग, व्यापार सेलमुळे पक्षाचे संघटन अधिक मजबूत होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:32+5:302021-08-13T04:26:32+5:30
नागेश फाटे हे १ ऑगस्टपासून मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, ...
नागेश फाटे हे १ ऑगस्टपासून मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आदी जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणचे स्थानिक आमदार, खासदार, राष्ट्रवादीचे मंत्री, माजी मंत्री, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन नवीन कार्यकारिणी निवडीसाठी मते जाणून घेत आहेत. या दौऱ्यात नागेश फाटे यांनी मोदी सरकारने उद्योग, व्यवसाय वाढीसाठी लादलेल्या जाचक अटी, जीएसटी यांचा उद्योग व्यवसायावर काय परिणाम होत आहे. त्या कमी करण्यासाठी राष्ट्रवादी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत. भंडारा, गोंदिया येथे नागेश फाटे यांचे माजी मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वागत करून त्यांच्याकडून सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले.
या दौऱ्यात त्यांनी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, आमदार अमोल मिटकरी, डॉ. सुनील कदम, राजीव कक्कड, राजीव वैद्य, रवींद्र वसेकर, विजय शिवणकर, नाना पंचभुते, दुनेश्वर पेठे, शिवराज गुजर, सुनील राऊत, बाळासाहेब पाटील, सुनील वराडे, विजय देशमुख, संग्राम गावडे, चंद्रकांत ठाकरे, नजीर काझी यांच्याशी नवीन निवडींविषयी चर्चा केली.
फोटो ओळी ::::::::::::::::
भंडारा, गोंदिया येथे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचे स्वागत करताना माजी केंद्रीयमंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, कल्याण कुसुमडे व पदाधिकारी.