देशी दारूचे दुकान एक महिन्यासाठी सील; चार हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:23 AM2021-03-27T04:23:25+5:302021-03-27T04:23:25+5:30
सांगोला पोलीस स्टेशनचे पोकॉ सिध्दनाथ शिंदे, सपोफौ. हनमंतराव माळकोटगी, पोना पवार, पोकॉ कदम, पोकॉ जाधव होमगार्ड झाडबुके असे सर्वजण ...
सांगोला पोलीस स्टेशनचे पोकॉ सिध्दनाथ शिंदे, सपोफौ. हनमंतराव माळकोटगी, पोना पवार, पोकॉ कदम, पोकॉ जाधव होमगार्ड झाडबुके असे सर्वजण सरकारी वाहनातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना कचेरी रोडवरील शरद मस्के यांच्या एस.एम. देशी दारु विक्री दुकानाची तपासणी केली असता दुकानात आस्थापनेचे मालक शरद मारुती मस्के (रा. सांगोला) यांच्यासह तीन इसम विनामास्क, सोशल डिस्टन्सींग न पाळता तसेच शासकीय सूचनांचे पालन न करता व्यवहार करीत असताना आढळुन आले.
आस्थापना कर्मचारी स्वप्नील शरद मस्के, प्रकाश गुंडाप्पा शिंदे (रा. मेडशिंगी, ता. सांगोला), ग्राहक नवनाथ अशोक लंगोटे (रा. मंगळवेढा) हे विनामास्क व फिजिकल डिस्टन्स पाळत नसल्याचे आढळून आले. या दुकानावर याअगोदर १९ मार्च रोजीही दंडात्मक कारवाई केली होती.