नॅचरल पोटॅश गोळी बनावट खताची राज्यभर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:40+5:302021-07-14T04:25:40+5:30
---- आकर्षक बॅगांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक गोळी पोटॅश या नावाने पुणे उस्मानाबाद नगर सोलापूर बीड या जिल्ह्यात रोज किमान ५०० ...
----
आकर्षक बॅगांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक
गोळी पोटॅश या नावाने पुणे उस्मानाबाद नगर सोलापूर बीड या जिल्ह्यात रोज किमान ५०० टन बोगस खत विकले जात आहे. या बनावट पोटॅशच्या बॅगा अत्यंत आकर्षक असल्यामुळे शेतकरी त्याला बळी पडत आहेत. अधिक नफ्यासाठी एजंट गावोगावी केवळ अधिक नफा मिळतो, म्हणून बनावट पोटॅश गावोगावी जाऊन थेट शेतकऱ्यांना विकणाऱ्या काही एजंटही फिरत आहेत. या सर्व प्रकाराला तत्काळ कृषी खात्याने बंधन घालावे. बनावट गोळी पोटॅश विकणाऱ्या त्यांच्या दुकानातील गोळी पोटॅशचा नमुना प्रयोगशाळेत तपासून कारवाई करावी, अशी मागणी महेश चिवटे यांनी केली आहे.
------
गोळी पोटॅश या नावाचे कोणतेही खत नियंत्रण कायद्यात नाही. अशा पद्धतीने कोण गोळी विक्री करीत असेल, अशा विक्रेत्यांची नावे शेतकऱ्यांनी कृषी खात्याला कळवावीत. - देवराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, करमाळा
-----
इंडियन पोटॅश ही कंपनी केंद्र सरकारच्या स्वायत्त मालकीची आहे. देशातील ८० टक्के पोटॅश आमची कंपनी आयात करते. गोळी पोटॅश नावाचे कोणतेही खत बाजारात उपलब्ध नाही. असे पोटॅश खत विकत असेल, तर याची माहिती कळवावी. आम्ही कंपनीला माहिती देऊ.
- संदीप चव्हाण, जिल्हा विक्री अधिकारी इंडियन पोटॅश लि.
---