कोरोना बाधित महिलेची नैसर्गिकरीत्या सुखरूप प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:23 AM2021-05-20T04:23:52+5:302021-05-20T04:23:52+5:30
जवळा (ता. सांगोला) येथील गर्भवती महिलेची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिची रॅपिड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यावर ...
जवळा (ता. सांगोला) येथील गर्भवती महिलेची प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिची रॅपिड टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. यावर नातेवाईकांचा विश्वासच बसेना म्हणून त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट केली, तीही पॉझिटिव्ह आली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नेहा पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रसूती विषयी चर्चा केली. डॉ. नेहा पाटील यांनी प्रसूतीची जबाबदारी घेऊन सदर महिलेला सांगोला येथील खासगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करुन घेतले आणि तत्काळ प्रसूतीची तयारी सुरू केली. १८ मे रोजी सदर महिलेची यशस्वीपणे नैसर्गिक प्रसूती यशस्वीपणे पार पडली.
यावेळी डॉ. नेहा पाटील, सांगोला वेल्फेअर असोसिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पियूष साळुंखे-पाटील, डॉ. मयुरा भागवत, रणजित साळुंखे, संदेश साळुंखे, तेजस भेंडे, अनिरुद्ध मागाडे, तब्बू सिस्टर, हॉस्पिटलचा सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले. कोरोना बाधित महिलेची यशस्वी नैसर्गिक प्रसूती झाल्याने नातेवाईकांसह रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास घेतला.
कोट ::::::::::::::::::::
सांगोला तालुक्यात कोविड रुग्णालयात कोरोना बाधित गरोदर महिलेची सुखरूप प्रसूती होण्याची ही पहिलीच घटना आहे. नातेवाईकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास व त्या विश्वासाला पात्र राहून महिलेची नैसर्गिक प्रसूती केली. प्रसूतीनंतर बाळ बाळंतीण सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला.
- डॉ. नेहा साळुंखे-पाटील
स्त्रीरोग तज्ज्ञ, सांगोला
फोटो ओळ ::::::::::::::::::::
जवळा येथील कोरोना बाधित गरोदर महिलेच्या सुखरूप प्रसूतीनंतर बाळासह स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नेहा साळुंखे-पाटील, डॉ. साळुंखे-पाटील व नातेवाईक.