बार्शीत शासकीय गोदामाला जत्रेचे स्वरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:22 AM2020-12-31T04:22:56+5:302020-12-31T04:22:56+5:30
बार्शी तालुक्यात १३१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ९६ गावांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रभागातील आरक्षण चुकीचे काढल्याच्या कारणावरुन राज्य निवडणूक ...
बार्शी तालुक्यात १३१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ९६ गावांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रभागातील आरक्षण चुकीचे काढल्याच्या कारणावरुन राज्य निवडणूक आयोगाने पानगावची निवडणूक रद्द केली आहे. वैराग नगरपंचायत होणार असल्यामुळे या ग्रामपंचायतीसाठी कोणीच अर्ज दाखल केले नाहीत. ९४ गावांतील ३०४ प्रभागातील ७९८ जागांसाठी निवडणूक होत आहे. शेवटच्या दिवस असल्याने उपळाई रोडवरील शासकीय धान्य गोदामाच्या परिसरात जत्रेचे स्वरुप आले होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते वाहने करुन या ठिकाणी आले होते. गोडाऊनच्या परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. तहसीलदार प्रदीप शेलार, निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे, बाळासाहेब चापले आदी या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून योग्य त्या सूचना संबंधितांना देत होते.
-----ऑफलाईन अर्जाच्या सुविधेने दिलासा---
ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाईट स्लो चालत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची परवानगी दिल्यामुळे अनेक उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला. गोडाऊनच्या परिसरात जिकडे पहावे तिकडे हातात बॅगा घेऊन ग्रुपने उभी असलेली माणसे दिसून आली. अनेक ठिकाणी वयोवृद्ध उमेदवार हातात काठी घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.
वैरागमध्ये एकही अर्ज दाखल नाही. चार दिवसात ७४७ अर्ज दाखल झाले होते.