निसर्ग सेवा फाउंडेशन करणार स्वच्छ अन् सुंदर अक्कलकोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:22 AM2021-03-08T04:22:01+5:302021-03-08T04:22:01+5:30
अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ...
अनेक शहरवासीयांनी स्वत: हाती झाडू घेऊन रविवारी पहाटे ६ ते सकाळी ८ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधी मठ व ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिर मार्ग परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन संस्थेच्या सदस्यांनी केले.
फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी ना गंदगी करेंगे, ना करने देंग चा मंत्र दिला. जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ अक्कलकोट अभियानाचे रुपांतर एका शहर चळवळीत झाले.
या मोहिमेत फाउंडेशन चे प्रमुख प्रसिद्ध सुनील बिराजदार, राचप्पा वागदरे, माजी मुख्याध्यापक भजे, तात्यासाहेब समाणे, विद्याधर गुरव, शशिकांत लिम्बीतोटे, प्रमोद लोकापुरे, दत्ता कटारे, रामेश्वर पाटील, अभिजीत लोके, विजयकुमार हंद्राळमठ, दत्ता काटकर, व्यंकटेश होळकर, सूरज आळंद, जयलिंग यादव, मल्लिनाथ बिराजदार, शंकर अलोणे, सुरेश हिरापुरे, चिंदानद बाबा, विनय धरणे, नितीन दोडाळे, संतोष शिर्के, सिध्दाराम मोघे, आनंद कालिबत्ते, रेवनसिध्द सावळे, विरुपाक्ष कुंभार हे सहभागी झाले होते.
सुटीच्या दिवशी राबविणार स्वच्छता मोहीम
या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक सुट्टी दिवशी वेगवेगळ्या भागात शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. मुख्यतः ग्रामदैवत परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उपक्रमामध्ये सातत्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सध्या २५ हून अधिक सभासद असून यात वाढ होत आहे. समाजउपयोगी कार्यामुळे नागरिकांचा याला प्रतिसाद मिळत आहे.
फोटो
०७अक्कलकोट-स्वच्छता
ओळी
भक्तांसह शहरवासीयांच्या निरोगी आरोग्यसाठी स्वच्छ अक्कलकोट सुंदर अक्कलकोट करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या निसर्ग सेवा फौंडेशनचा शुभारंभ स्वच्छतेच्या मोहिमेनेच केला.