राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:24 AM2020-12-06T04:24:12+5:302020-12-06T04:24:12+5:30
सोलापूर : कृषीविरोधी धोरण केंद्र सरकारने आणले आहे. या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून निषेध ...
सोलापूर : कृषीविरोधी धोरण केंद्र सरकारने आणले आहे. या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून निषेध केला. केंद्र सरकारच्या धोरणांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेटवर निदर्शने केली. बराच वेळ कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी पूनम गेट परिसर दणाणला.
दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा दर्शवला. ‘शरद पवार का एकही नारा... किसान हमारा... किसान हमारा... अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात देशस्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत.
यावेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, प्रदेश प्रवक्ता मनोहर सपाटे, जनार्दन कारमपुरी, राजन जाधव, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, महिला अध्यक्ष सुनीता रोटे, विद्यार्थी संघटना अध्यक्ष निशांत सावळे, उपाध्यक्ष मनीषा माने, माजी नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार, जावेद खैरदी, सोशल मीडिया शहराध्यक्ष प्रमोद भोसले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अमीर शेख, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष तन्वीर गुलजार, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक पदाधिकारी सागर चव्हाण, सरचिटणीस बसवराज कोळी, शामराव गांगर्डे, संजय मोरे, युवक पदाधिकारी सोमनाथ शिंदे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.