आमदार भारत भालके यांचा राजीनामा, राष्ट्रवादीकडून लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 03:15 PM2019-09-30T15:15:30+5:302019-09-30T15:19:28+5:30
विधानसभा निवडणूक; राजकीय घडामोडींना आला वेग
सोलापूर : पंढरपूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे पी.एस सागर यांच्याकडे सुपूर्द केला. आमदार भालके राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आमदार भारत भालके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले होते. भाजपची सोमवारी सकाळी मेगा भरती झाली. यात भालके यांचा समावेश नव्हता. त्यामुळे भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दुसरीकडे पंढरपूर विधानसभेची जागा भाजपचा मित्र पक्ष रयत क्रांती संघटनेला सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. रयत क्रांती संघटनेकडून माजी आमदार सुधाकरपंत परिचारक उमेदवार असतील, अशी माहिती रयतचे जिल्हाध्यक्ष दीपक भोसले यांनी दिली. सोमवारी सायंकाळी परिचारक यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, असेही त्यांनी सांगितले.