सोलापूरात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, भाजप भगावो, रोजगार बचावो चा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:09 PM2018-02-08T13:09:06+5:302018-02-08T13:11:38+5:30
भाजप भगावो, रोजगार बचावो, बेरोजगार तरुणांची फसवणूक बंद करा, अशा विविध घोषणा देत सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : भाजप भगावो, रोजगार बचावो, बेरोजगार तरुणांची फसवणूक बंद करा, अशा विविध घोषणा देत सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर युवकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
चार हुतात्मा पुतळा येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस संग्राम कोते-पाटील, शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे, सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जुबेर बागवान, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रांत माने, माजी प्रदेश युवक अध्यक्ष उमेश पाटील आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भारतीय जनता पार्टीने २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दरवर्षी देशातील २ कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. आज या शासनाला चार वर्षे झाली तरी आश्वासनांची पूर्तता झाली नाही. भाजपने दिलेल्या आश्वासनांप्रमाणे वर्षाला २ कोटीप्रमाणे चार वर्षांत ८ कोटी युवकांना नोकरी देणे अपेक्षित होते. सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात पुन्हा ७० लाख युवकांना रोजगार देऊ, अशी खोटी व फसवी आश्वासने दिलेली आहेत. शासनाच्या सर्व योजना फसल्या आहेत. कौशल्य विकास योजनेच्या राज्यामध्ये ७ हजार २५२ प्रशिक्षण संस्था आहेत. त्यांचे अनुदान देण्यात आले नाही. ५५ हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. डी. एड., बी. एड. झालेल्या युवकांच्या नोकºयांचा प्रश्न प्रलंबित आहे. शासनाने अनेक शासकीय विभाग नोकरभरती टाळून युवकांवर बेरोजगारीची वेळ आणली आहे आदी समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी आप्पाराव काळे, प्रशांत बाबर, मल्लेश बडगू, रूपेश भोसले, कार्यकर्ते उपस्थित होते.