राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली शरद पवार यांची भेट; जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 06:29 PM2021-10-07T18:29:30+5:302021-10-07T18:29:35+5:30

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी दोन टी.एम.सी. पाण्याच्या तरतूदी बाबत कृतज्ञता

NCP's disgruntled group meets Sharad Pawar; Read the complaint about the district leadership | राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली शरद पवार यांची भेट; जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा

राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली शरद पवार यांची भेट; जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा

Next

मंगळवेढा /मल्लिकार्जुन देशमुखे
 मंगळवेढ्याच्या ३५ गावच्या पाणी प्रश्नी  महाविकास आघाडी सरकारने राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी दोन टी.एम.सी. पाण्याची तरतूद करुन तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंगळवेढ्यातील शिष्टमंडळाने खा.शरद पवार यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करीत योजनेला गती देण्याची विनंती केली.

मंगळवेढा तालुक्यावर नेहमीच पालकत्वाच्या भूमिकेतून  नजर ठेवून असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार  खा.शरद पवार यांचे मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त केले. २०२१ च्या सुधारीत ताळेबंदात दोन टी.एम.सी.पाण्याची तरतूद नुकतीच करण्यात आली आहे . यावेळी पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक पांडुरंग चौगुले यांनी संबंधित गावातील  सर्वेक्षण पूर्ण झाले असून सदरच्या योजनेस फेरमंजुरी , आर्थिक तरतूद करावी अशी मागणी  केली , तर राष्ट्रवादीचे नेते भारत बेदरे यांनी  सदर योजनेचे उदगाते स्व.भारतनाना भालके यांचे नाव सदर योजनेस  देण्यासंबंधी 5 सप्टेंबर रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवेढा येथील बैठकीत करण्यात आलेल्या ठरावाची माहिती पवार साहेबांना देऊन ही योजना त्वरीत पुर्णत्वास जावी यासाठी लक्ष घालावे अशी मागणी  केली. 
या शिष्टमंडळात जि.प.सदस्य नितिन नकाते, न.पा.गटनेते अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, बशीर बागवान, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुनिल डोके, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मुझम्मिल काझी, सोमनाथ बुरजे इ.प्रमुख पदधिकार, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये कार्यरत पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने फेरबदल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पक्ष संघटनेमध्ये काही मंडळींनी कंपूगिरी चालवली असून त्यामुळे त्यामुळे अंतर्गत कलह व गटबाजी वाढीस लागल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून  दिल्याचे भारत बेदरे यांनी सांगितले.

Web Title: NCP's disgruntled group meets Sharad Pawar; Read the complaint about the district leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.