माळशिररस तालुक्यात राष्ट्रवादीचे यापुढे होणारे कार्यक्रम उधळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:40+5:302021-09-19T04:23:40+5:30

राज्यात महाविकास आघाडीच्या नावाने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे, हे विसरून माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन ...

NCP's upcoming programs in Malshiras taluka will be disrupted | माळशिररस तालुक्यात राष्ट्रवादीचे यापुढे होणारे कार्यक्रम उधळणार

माळशिररस तालुक्यात राष्ट्रवादीचे यापुढे होणारे कार्यक्रम उधळणार

Next

राज्यात महाविकास आघाडीच्या नावाने शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे, हे विसरून माळशिरस तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार व पालकमंत्री करताना दिसून येत आहेत. यासाठी निमंत्रणपत्रिका छापून मोठमोठे डिजिटल बॅनर लावले जात आहेत; परंतु यावर फक्त राष्ट्रवादीच्याच नेतेमंडळींचे फोटो टाकले जात आहेत. आपण पालकमंत्रीपदावर शिवसेना व काँग्रेसच्या बळावर आहोत, याचा विसर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना व पालकमंत्र्यांना पडला आहे की काय? का जाणूनबुजून या गोष्टी केल्या जात आहेत. यापुढे जर सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री व काँग्रेसच्या नेतेमंडळींचे फोटो टाकले नाहीत, तर युवासेना राष्ट्रवादीचा कार्यक्रम उधळून लावेल, असा इशारा युवासेनेचे माळशिरस तालुकाप्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.

----

यापुढे असे चालणार नाही

विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री दत्तामामा भरणे जांबूड येथे आले असता त्यांच्यासमवेत आमदार बबनराव शिंदे, राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्यासह फक्त राष्ट्रवादीच्याच नेतेमंडळींचा लवाजमा होता. या कार्यक्रमासाठी शिवसेनेची अथवा काँग्रेसची कोणतीच मोठी नेतेमंडळी निमंत्रित नव्हती. यापुढे हे असेच चालत राहिले, तर युवासेना आक्रमक भूमिका घेऊन राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांचाच नव्हे, तर राष्ट्रवादीच्या कोणत्याच मंत्र्यांचा अथवा नेतेमंडळींचा सार्वजनिक कार्यक्रम माळशिरस तालुक्यात होऊ देणार नाही, असे इंगळे यांनी म्हटले आहे.

----

Web Title: NCP's upcoming programs in Malshiras taluka will be disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.