NDRF ची टीम सोलापूर जिल्ह्यात दाखल; सासुरे, घाटणे गावातील लोकांची केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:39 AM2020-10-15T11:39:47+5:302020-10-15T11:39:54+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिकांसह अनेक घरांचे नुकसान झाले आहे़ जिल्ह्यातील काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरातील लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफची टीम सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. गुरूवारी सकाळी मोहोळ तालुक्यातील सासुरे, घाटणे गावात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम या टीमने पूर्ण केले.
दरम्यान, दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाºया अनेक नद्यांना प्रमाणापेक्षा पाणी आले आहे, त्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. उजनीतून भीमानदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पुरातील लोकांना वाचविण्यासाठी व सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफची टीम सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे़ पुरामुळे नद्या काठच्या लोकांना सुरक्षित हलविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.