अक्कलकोट तालुक्यात बळीराजाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:02+5:302021-06-17T04:16:02+5:30

अक्कलकोट तालुका तसा अवर्षणप्रवण म्हणून परिचित मात्र दोन वर्षांपासून वेळेवर पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना खरीप पिके हाती लागत आहेत. ...

Near Baliraja in Akkalkot taluka | अक्कलकोट तालुक्यात बळीराजाची लगबग

अक्कलकोट तालुक्यात बळीराजाची लगबग

Next

अक्कलकोट तालुका तसा अवर्षणप्रवण म्हणून परिचित मात्र दोन वर्षांपासून वेळेवर पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांना खरीप पिके हाती लागत आहेत. यंदाही मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र कोरोनामुळे अनेकांना मशागती वेळवर करण्यास विलंब झाला. वेळेवर पाऊस झाल्याने शेतकरी गोंधळून गेले. मात्र पावसाने उघडीप दिल्याने मशागतीला वेग आला असून, काहींनी पेरणीही सुरू केली आहे.

चप्पळगाव, वागदरी भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनला पसंती असून, उर्वरित भागात तूर, उडीद, मूग, सूर्यफूल, भुईमूग आदी पिकांची पेरणी करीत आहेत. आतापर्यंत वीस टक्के पेरणी झाली असून, या आठवड्यात किमान पन्नास टक्के पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. सध्या बी बियाणे, रासायनिक खतांचा तुटवडा असला तरी लवकरच सुरळीत होईल, अशी ग्वाही कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

----

अक्कलकोट तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ४१ हजार ८७९ हेक्टर आहे. लागवडीचे क्षेत्र ६६ हजार ३२७ हेक्टर आहे. तूर पिकासाठी निश्चित क्षेत्र ३२ हजार, उडीद १९ हजार ५०० हेक्टर, मूग ७ हजार, सोयाबीन ४५०० हेक्टर, सूर्यफूल ४१००, कांदा १०००, ऊस १२५०० असे एकूण ८५ हजार ६०० हेक्टर पेरणीयुक्त क्षेत्र आहे. सध्या २० टक्के पेरणी झाली असून या आठवड्यात ५० टक्के होण्याची शक्यता आहे. वागदरी, शिरवळ, शिरवळवाडी, सदलापूर खैराट, गोगाव, किरनळळी, घोसाळगाव, बादोला, साफळे, तर चप्पळगाव भागात हंनुर, पितापूर, चुंगी, दर्शनाळ आदी भागात सोयाबीन पिकाची पेरणी अधिक प्रमाणात आहे. उर्वरित भागात सर्व पिकांची पेरणी होत आहे.

----

बियाणे, खतांचा लवकरच तुटवडा थांबेल आणि सुरळीत होईल. सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे. शक्यतो घरगुती सोयाबीन बियाणे वापरावे. शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी घाईगडबडीत करू नये. आणखी भरपूर वेळ आहे.

- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी

Web Title: Near Baliraja in Akkalkot taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.