समतावादी सघटनांनी एकत्र येण्याची गरज: आ़ ह़ साळुंखे
By admin | Published: May 11, 2014 12:25 AM2014-05-11T00:25:27+5:302014-05-11T00:25:27+5:30
पंढरपूर : महाराष्टÑाची संतपरंपरा संत नामदेवापासून ते संत चोखामेळा व संत जनाबाईपर्यंत असून त्यांनी ७०० वर्षींपूर्वी समतेचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला.
पंढरपूर : महाराष्टÑाची संतपरंपरा संत नामदेवापासून ते संत चोखामेळा व संत जनाबाईपर्यंत असून त्यांनी ७०० वर्षींपूर्वी समतेचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु नगर व खर्डी येथील दलितांवरील अत्याचार्यांच्या घटना पाहिल्या तर विषमतावादी विचार पुन्हा महाराष्टÑात तोंड वर काढल्याचे दिसून येते़ त्यामुळे समतावादी विचारांच्या संघटनांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे जेष्ठ विचारवंत प्रा. आ. ह. साळुंखे यांनी सांगितले. १० मे १९४७ या दिवशी विठ्ठलाचे दर्शन अस्पृशांना मिळाले पाहिजे, पुजार्यांची आडकाठी दूर झाली पाहिजे, यासाठी साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे उपोषण सुरु केले होते. या उपोषणाच्या स्मरणदिनानिमित्त राष्टÑीय सेवा दलाच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी जेष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे आले होते. यावेळी ते बोलत होते. साने गुरुजींनी जनहितासाठी केलेल्या उपोषणाला ७६ वर्ष पूर्ण होऊनही त्यांचे पंढरपुरात आजही स्मारक नाही, यामुळे त्यांचे स्मारक पंढरपूरमध्ये करण्याची मागणी ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केली. राजकारण करत असताना कधीच विषमतेचा विचार करत नसून समतेचा संदेश रुजविण्याचे काम करत असल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
--------------------------
नामदेव महाराजांचे आठ वेळा भारतभ्रमण ४कुठलेही साधन नसताना, भाषेची अडचण न येता संत नामदेव महाराजांनी ८ वेळा भारत भ्रमण केले. याची दखल महाराष्टÑाने कधीच घेतली नाही, यांची खत वाटते. संत तुकोबा, संत ज्ञानोबा, संत नामदेव यांनी संत मांदियाळीत समतेचा विचार जाणीवपुर्वक महाराष्टÑात रुजवला असल्याचे प्रा. आ. ह. सांळुखे यांनी सांगितले.