वक्तृत्व कला संपादनासाठी आत्मविश्वासाची गरज, राजेंद्र बीडकर यांचे मत, सोलापूरातील वालचंद महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 05:20 PM2018-01-08T17:20:51+5:302018-01-08T17:22:46+5:30
श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र बीडकर बोलत होते.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : वक्तृत्व ही कला मानवाला निसर्गाकडून मिळालेली अमूल्य देणगी आहे. अमोघ वाणीच्या बळावर देदीप्यमान कार्य घडवून आणता येते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक अशा सगळ्याच स्तरावर वक्तृत्वाच्या प्रभावी अस्त्राचा उपयोग करून दणदणीत यश संपादन करणे शक्य आहे. उत्कृष्ट वक्त्यांचे वक्तृत्व एकणे आणि प्रयत्नाला सातत्याबरोबर आत्मविश्वासाची जोड देणे शक्य झाले की ही कला अवगत करता येते, असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापक डॉ. राजेंद्र बीडकर यांनी केले.
श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान व श्री ऐल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. राजेंद्र बीडकर बोलत होते. यावेळी वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त भूषण शहा, पराग शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, प्राचार्य डॉ. शिवकुमार गणापूर, प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत चव्हाण, प्रा. बाजीराव अहिरे, माजी प्राचार्य डॉ. आर.आर. शहा, डॉ. राजशेखर हिरेमठ, यशवंत बोधे आदी उपस्थित होते.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जन्मजात वक्तृत्वसंपन्न नेत्यांच्या उदाहरणांबरोबर उच्चार सुस्पष्ट नसलेला ग्रीक वक्ता सिसोरी यांनी परिश्रमातून प्राप्त केलेल्या अमोघ वाणीची उदाहरणे देत डॉ. बीडकर म्हणाले की, वक्तृत्व कला साध्य करण्यासाठी अवांतर वाचनाने शब्दभांडार वाढविणे, विचार यावर वक्त्याच्या वाणीला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे सकारात्मक, सात्विक, अहिंसात्मक विचारसरणी जोपासावी, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. पी.एस. देवसाळे यांनी केले तर आभार डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी मानले.