कोविडचा सामना करण्यासाठी समन्वयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:05+5:302021-05-07T04:23:05+5:30
शहरातील अलिपूर रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची निवास व भोजन व्यवस्था करणाऱ्या भगवंत मोफत सेवाकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते ...
शहरातील अलिपूर रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात कोविड रुग्णांच्या नातेवाईकांची निवास व भोजन व्यवस्था करणाऱ्या भगवंत मोफत सेवाकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
माजी मंत्री दिलीप सोपल व महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी स्वखर्चातून हा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. यावेळी राजेंद्र मिरगणे, स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तहसीलदार सुनील निल शेरखाने, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अशोक ढगे, डॉ. संजय अंधारे, आय. एम. ए. चे बार्शी शाखाध्यक्ष डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. स्नेहल माढेकर, अरुण कापसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
हे सेवाकेंद्र २४ तास सुरू राहील. या सेवाकेंद्रात महिलांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज रुग्णांच्या नातेवाईकांना चहा, नाष्टा व दोन वेळेस जेवण मोफत दिले जाणार आहे. नातेवाईकांच्या ताप व ऑक्सिजनचीही तपासणी केली जाणार आहे. कोविड रुग्णांच्या मदतीसाठी ऑक्सिजन रुग्णवाहिका सुरू करणार आहोत असे मिरगणे यांनी सांगितले.
भाऊसाहेब आंधळकर यांनी रेमडेसिविर इंजेक्शन आवश्यकतेनुसार रुग्णांना देण्यासाठी थेट डॉक्टरांनाच उपलब्ध करून द्यावेत. याबाबतचे अधिकार अन्य प्रशासनाला असू नयेत, अशी मागणी केली. डॉ. संजय अंधारे यांनी कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांबरोबरचा संपर्क कालावधी नातेवाईकांनी अधिकाधिक कमी करावा. तसेच थेट डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्याही कमीतकमी संपर्कात नातेवाईकांनी यावे असे आवाहन केले.
डॉ. अशोक ढगे म्हणाले, कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. पण कोरोनाची भीती मात्र खूप वाढली आहे. कोरोना मनातून काढून टाकला तरच शरीरातून जाईल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाय पाळावेत मात्र नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा काकडे यांनी केले तर आभार नागेश अक्कलकोटे यांनी मानले.
----