थेअरीऐवजी प्रॅक्टिकल शिक्षणाची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:00+5:302021-02-07T04:21:00+5:30
करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी सुजित बागल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, माजी ...
करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी सुजित बागल, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, अशपाक जमादार उपस्थित होते.
आ. लाड म्हणाले, केंद्रातील सरकार हे फक्त आश्वासने देते. प्रत्यक्षात देशातील उद्योगधंदे बंद पडत असून, लाखो बेरोजगार बेकारीमध्ये जीवन कंठत आहेत.
ग्रामीण भागातील लघु, मध्यम व मोठे उद्योग सुरू करून त्यांना आर्थिक मदत व सबसिडी देणे गरजेचे आहे. कृषिप्रधान देशामध्ये शेतीमालाला हमीभाव देणे आवश्यक आहे. राज्य सरकारकडे पदवीधर युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण आग्रही आहोत, असे स्पष्ट मत पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले.
फोटो
०६करमाळा प्रेस
ओळी : करमाळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आ. अरुण लाड.