खेळांची व्यापकता वाढविण्यासाठी क्रीडा संकुलाची गरज : आवताडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:36+5:302021-06-27T04:15:36+5:30
मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवेढा तहसील कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत ...
मंगळवेढा तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवेढा तहसील कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंगळवेढा तालुक्यातील अनेक विद्यार्थी, युवक व युवतींनी विविध खेळांच्या माध्यमातून मंगळवेढ्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुका खेळांची परंपरा लाभलेला तालुका आहे. या तालुक्यातील क्रीडापटूंच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी उभारण्यात येत असलेले क्रीडा संकुल खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार डॉ. स्वप्निल रावडे, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, प्रा. येताळा भगत, शशिकांत चव्हाण, औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकूल, रामचंद्र दत्तू आदी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी सत्यम जाधव यांनी केले.