रसायनमुक्त रानभाज्यांचा आहारात वापर आवश्यक : आवताडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:34+5:302021-08-13T04:26:34+5:30
खर्डी (ता. पंढरपूर) येथे कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटन युवक नेते विराज आवताडे यांच्या ...
खर्डी (ता. पंढरपूर) येथे कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे उद्घाटन युवक नेते विराज आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रानभाज्या महोत्सवात कडवंची, अंबाडी, चुका, माठ, चाकवत, आळू, शेवगा, राजगिरा, घोळ, नळी, आघाडा, अंबुशी, पालक, चुका आदी पालेभाज्यांचा समावेश होता. यावेळी पं. स. सदस्य प्रशांत देशमुख, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार, मंडल कृषी अधिकारी खरात, कृषी पर्यवेक्षक सुनील प्रक्षाळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास भोसले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव माने, कृषी सहायक आर.एन. परचंडराव, भोसले, सरपंच भगवान सव्वाशे, उपसरपंच शरद रोंगे, ग्रा.पं. सदस्य नारायण रोंगे, महादेव लवटे, सचिन ताटे, दत्ता यादव, सुनील रणदिवे, अनिल कांबळे आदी उपस्थित होते.