शहरातील १८ केंद्रावर पार पडली 'नीट' परीक्षा
By संताजी शिंदे | Published: May 5, 2024 08:24 PM2024-05-05T20:24:52+5:302024-05-05T20:25:01+5:30
'केएलई' स्कूलमध्ये झाली परीक्षा
सोलापूर: वैद्यकीय परीक्षेसाठी अनिवार्य असलेली नॅशनल इलीजीबीलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट यूजी) ही परीक्षा सोलापुरातील १८ परीक्षा केंद्रावर पार पडली. परिक्षेला सोलापूर विभागातून ७ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला होता.
वर्षातून एकदा 'नीट' परीक्षा घेतेली जाते. बारावी सायन्स, बायलॉजी विषय घेतलेले विद्यार्थी या देशपातळीवरील परीक्षेला सामोरे जात असतात. या परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. 'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे. २०२४ च्या परीक्षेसाठी देशभरातून २४ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी 'नीट' परीक्षेचे अर्ज भरले आहेत. यासाठी देशातील ५५७ शहरात आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा केंद्रे बनविण्यात आली आहेत.
देशपातळीवर एकाच वेळी घेण्यात येणारी ही परीक्षा इतर परीक्षांच्या तुलनेत अतिशय कडक असते. हॉल तिकिटावर फोटो, स्वाक्षरी, आधार कार्ड यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाते. विद्यार्थ्यांच्या अंगावर कोणतेही दागिने घालु दिले जात नाही.
'केएलई' स्कूलमध्ये झाली परीक्षा
शहरातील केएलई स्कूलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरूवात झाली. आतमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना त्यांच्या हाताली धागाही प्रवेद्वारावर कापण्यात येत होते. विद्यार्थ्यांनी हाफ शर्ट, साधी पॅन्ट असा पोषाख घालणे अपेक्षीत होते. नियमांचे काटेकोर पहाणी करूनच विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. केएलई स्कूल शहरातील नीट परीक्षेचे समन्वयक म्हणून काम पहात होती.