महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणा-या रेल्वे प्रवाशांना कोरोना चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक

By Appasaheb.patil | Published: April 1, 2021 03:03 PM2021-04-01T15:03:15+5:302021-04-01T15:03:22+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Negative corona test certificate mandatory for train passengers traveling from Maharashtra to Karnataka | महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणा-या रेल्वे प्रवाशांना कोरोना चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणा-या रेल्वे प्रवाशांना कोरोना चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक

googlenewsNext

सोलापूर - कोविड-१९(साथीचा रोग)  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकाराने आदेश जारी केला आहे की, जे लोक रेल्वेने प्रवास करत असतील त्यांनी प्रवासासोबत आरटी-पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र (कोविड-19 चे तपासणी प्रमाणपत्र) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे आरटी-पीसीआर प्रमाणपत्र (कोविड-19 चे तपासणी प्रमाणपत्र)   प्रवासाच्या दिवसापासून 72 तासांपेक्षा जुने असू नये.  कमी अंतराच्या प्रवाश्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केल्याप्रमाणेच लागू होतील. त्यामुळे आता रेल्वेने प्रवास करतेवेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणा-या प्रवाशांना कोरोनाचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकार केले आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने माहिती दिली.

निगेटिव्ह (कोविड-19 चे तपासणी प्रमाणपत्र)  आरटी-पीसीआर प्रमाणपत्रास सूट दिली आहे. ह्यामध्ये घटनात्मक कार्य करणारे (Constitutional functionaries ) आणि आरोग्य सेवा व्यावसायिक,  2 वर्षाखालील मुले आणि गंभीर आपत्कालीन परिस्थितीत (जसे कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय उपचार इत्यादी). या प्रवाशांचे गंतव्य स्थानकावर स्वॅब घेवून तपासाणी केली जाईल. यासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे जसे फोन नंबर, पत्ता इत्यादी हे त्यांच्या आयकार्ड सोबत सत्यापित करण्यात येईल. आरटी-पीसीआर टेस्ट ((कोविड-19 चे तपासणी प्रमाणपत्र) रिपोर्ट आल्यानंतर राज्य शासनाच्या प्रोटोकॉलनुसार पुढील कार्यवाही केली जाईल असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Negative corona test certificate mandatory for train passengers traveling from Maharashtra to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.