राजकीय सभांसाठी सोलापूर शहरात नव्याने २८ ठिकाणे निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:12 PM2019-04-05T14:12:31+5:302019-04-05T14:13:52+5:30
महापालिकेने यापूर्वी शहरातील ३२ ठिकाणांची यादी जाहीर केली होती. आता त्यात बदल करून २८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
सोलापूर : राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, कॉर्नर सभा यांच्यासाठी महापालिकेने नव्याने २८ ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. सर्व यंत्रणाच्या परवानगीनंतरच सभेला परवानगी देण्यात येईल, असे महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.
महापालिकेने यापूर्वी शहरातील ३२ ठिकाणांची यादी जाहीर केली होती. आता त्यात बदल करून २८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यात जाहीर सभा ठिकाणे - लक्ष्मी मिल कंपाउंड, पार्क स्टेडियम, नेहरूनगर क्रीडांगण, सेटलमेंट समाजमंदिर लगतचे मैदान, पुंजाल मैदान (शांती चौक), कर्णिक नगर फुटबॉल मैदान.
मैदान सभा ठिकाणे
सावरकर मैदान (आसार मैदान), हुडको क्र. ३ क्रीडांगण, दाजीपेठ क्रीडांगण, चिल्ड्रन पार्क लगत असलेली खुली जागा (कर्णिक नगर), संभाजी तलाव लगत असलेली राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील खुली जागा, परिवहन बसडेपो परिसर, बुधवार पेठ.
कॉर्नर सभा ठिकाणे
भैय्या चौक, कन्ना चौक, जुळे सोलापूर चौक, महावीर चौक, जगदंबा चौक, विजापूर वेस चौक, नई जिंदगी चौक, सलगर वस्ती चौक, बेडरपूल चौक, कुमठा नाका चौक, जिल्हा परिषद गेट चौक, माधव नगर चौक, विडी घरकूल चौक, दत्त नगर चौक, मिलिंद नगर चौक, शेळगी चौक.
जाहीर सभा, मैदान व कॉर्नर सभेकरिता पोलीस विभाग, वाहतूक शाखा, महापालिका, निवडणूक कार्यालय यांची मान्यता आवश्यक आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी कॉर्नर सभेसाठी परवानगी हवी असल्यास वरील सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क करावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.
शाळा परिसर आणि सायलेंट झोनला वगळले
- नगर अभियंता संदीप कारंजे म्हणाले, शाळेच्या मैदानात सभा घेता येत नाही. त्यामुळे शाळेचे मैदान वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील काही चौक सायलेंट झोन आहेत. त्या जागाही वगळण्यात आल्या आहेत.
- यात मजरेवाडी शाळा, महावीर चौक, बाळीवेस चौक, जय भवानी प्रशाला, सम्र्राट चौक, दयानंद चौक परिसर यांचा समावेश आहे. नव्याने बुधवार पेठेतील परिवहन बस डेपोच्या मैदानाचा समावेश करण्यात आला आहे.