पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरी
By Admin | Published: March 25, 2017 05:30 PM2017-03-25T17:30:07+5:302017-03-25T17:30:07+5:30
पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरी
पंढरपुरात महावितरणच्या नवीन मंडल कार्यालयास मंजुरी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यापुर्वी महावितरण विभागाचे एक मंडल कार्यालय होते. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांचा भार एकाच मंडल कार्यालयावर येत होता. नवीन मंडल कार्यालय व्हावे अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार पंढरपूर येथे नवीन मंडल कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे़ तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप व अक्कलकोट येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आल्याची माहिती सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़
शुक्रवारी मंत्रालयात ऊजामंत्र्याच्या दालनात सोलापूर जिल्ह्यातील वीज प्रश्नासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, कार्यकारी संचालक (मांस) सचिन ढोले, सोलापूर जिल्हा ऊर्जा समन्वयक मोहन आलाट यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सोलापूर जिलह्यातील विजेच्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. शुक्रवारी झालेल्या बैठकीत ऊर्जा सचिव संजीवकुमार यांच्यासोबत ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. त्यांनी पंढरपूर येथील मंडल कार्यालयाच्या निर्मितीची सूचना मान्य करून कार्यवाही करण्यास संमती दिली. यामुळे पंढरपूर येथील मंडल कार्यालयास तत्काळ मंजुरी देण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातही अशीच स्थिती असल्याने सध्या उपलब्ध असलेल्या कार्यालयावर व यंत्रणेवर ताण पडत असल्याने तेथेही उपविभागीय कार्यालयाची आवश्यकता होती. यामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अथक प्रयत्नाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप आणि अक्कलकोट येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली.
--------------------------------------------------
पंढरीतील पोल फॅक्टरी होणार कार्यान्वित
पंढरपूर येथील महावितरण कंपनीच्या मालकीची पोल फॅक्टरी सध्या बंदावस्थेत आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पोल उपलब्ध करणे आणि पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे बंद असलेली फॅक्टरी पुन्हा सुरू करण्याबाबात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांना सुचविले. त्यांनी तत्काळ याला सहमती दर्शवित हा कारखाना तत्काळ सुरू करण्याचे आदेश याच बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबरच पंढरपूर येथे नवीन स्थापत्य विभाग व चाचणी विभागाची निर्मिती करण्यासही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नामुळे मान्यता देण्यात आली आहे.