सोलापुरातील नवीन चिप्पा मंडईचे कट्टे पडले ओस, विक्रेत्यांना अद्याप ‘सत्तर फूट’चाच सोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:10 PM2018-11-30T12:10:04+5:302018-11-30T12:11:45+5:30

यशवंत सादूल ।  सोलापूर : मागील २५-३० वर्षांपासून भाजी बाजाराच्या अतिक्रमणामुळे गुदमरलेल्या ७० फूट रोडने गुरूवारी मोकळा श्वास घेतला. ...

New Chipa Mandai has been found in Solapur, dew, and still sellers of 'seventy feet' | सोलापुरातील नवीन चिप्पा मंडईचे कट्टे पडले ओस, विक्रेत्यांना अद्याप ‘सत्तर फूट’चाच सोस

सोलापुरातील नवीन चिप्पा मंडईचे कट्टे पडले ओस, विक्रेत्यांना अद्याप ‘सत्तर फूट’चाच सोस

googlenewsNext
ठळक मुद्देमहानगरपालिकेच्या वतीने चिप्पा मार्केटमध्ये मागील २० वर्षांपासून भाजी मार्केट बांधून तयारफूटपाथवरील बाजाराची सवय जडल्याने विक्रेते तिकडे जायला तयार नाहीत. ७० फूटचा प्रशस्त मार्गही या बाजारामुळे अपुरा पडायला लागला

यशवंत सादूल । 

सोलापूर : मागील २५-३० वर्षांपासून भाजी बाजाराच्या अतिक्रमणामुळे गुदमरलेल्या ७० फूट रोडने गुरूवारी मोकळा श्वास घेतला. महानगरपालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने सकाळी झालेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमध्ये येथील फूटपाथवरील बाजार हटविण्यात आला. तेथील विक्रेत्यांना चिप्पा मार्केट (अशोक चौक) येथील कट्टे देण्यात आले आहेत. मात्र काहीतर बदल होईल आणि पुन्हा जुन्याच ठिकाणी भाजी बाजार भरेल, या प्रतीक्षेत गुरू वारी दुपारी येथील विक्रेते बसलेले दिसून आले.

महानगरपालिकेच्या वतीने चिप्पा मार्केटमध्ये मागील २० वर्षांपासून भाजी मार्केट बांधून तयार आहे. मात्र फूटपाथवरील बाजाराची सवय जडल्याने विक्रेते तिकडे जायला तयार नाहीत. ग्राहकांकडूनही या रस्त्यावरच्या भाजी बाजाराला प्रतिसाद मिळत असल्याने मागील १५ वर्षात येथील बाजार वाढत गेला. मात्र ७० फूटचा प्रशस्त मार्गही या बाजारामुळे अपुरा पडायला लागला. ग्राहकांची भर रस्त्यावर उभी राहणारी वाहने, अगदी रस्त्यावर लागणारी दुकाने, हातगाड्या यामुळे स्थानिक नागरिकांची डोकेदुखी मात्र वाढलेली होती. एकीकडे सोलापूर स्मार्ट करायला निघालेल्या प्रशासनालाही हा रस्त्यावर भरणारा बाजार हटवून नियोजित स्थळी म्हणजे चिप्पा मार्केटमध्ये स्थलांतरित करणे आवश्यक होते. त्यामुळे बुधवारी महानगरपालिकेने एक कार्यक्रम आयोजित करून या मार्केटमध्ये विक्रेत्यांना पाचारण केले. सर्व विक्रेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून ओट्यांचे वाटप केले. 

दरम्यान, गुरूवारी विक्रेत्यांनी नेहमीप्रमाणेच ७० फूट रोडवर येऊन दुकाने थाटली. मात्र अतिक्रमण हटावो मोहिमेतील पथकाने या सर्व भाजी विक्रेत्यांशी संवाद साधत रस्त्यावरील विक्री बंद करून मंडईत जाण्यास विनंती केली. त्यानंतर भाजीविक्री बंद करण्याच्या सूचना केल्या. 

दुपारी या परिसराला भेट दिली असता ७० फूट रोडवर फूटपाथवर विक्रेते निवांत बसलेले दिसून आले. महानगरपालिका प्रशासन विक्रेत्यांच्या बाजूने विचार करून काहीतरी सकारात्मक निर्णय होेईल, अशी आशा अनेकांनी व्यक्त केली. 
७० फूट रोड भाजी मार्केटचे अध्यक्ष दौला बागवान म्हणाले, महानगरपालिकेने बाजार बंद पाडल्याने २०० विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. मागील ३० वर्षांपासून या ठिकाणी विक्री सुरू होती. या सर्वांना जागा मिळालेली नाही. त्यामुळे अनेकांच्या उपजीविकेचे साधन हिरावणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दत्ता भाले, गणपत वाघमारे, जैबुन शेख, गणेश वाघमारे, ताराबाई कोळे, स्मिता मांडवी आदींसह अनेक विक्रेते फूटपाथवर बसलेले दिसून आले.

पिशवी हलवीत गेल्या..
- अशोक चौक येथील नियोजित मंडईमध्ये भाजी बाजार सुरू होणार, असे कळल्याने रंजना रमेश घनाते या आजीबाई पिशवी घेऊन आल्या. मात्र मंडईत एक ही भाजी विक्रेता नसल्याचे पाहून रिकामी पिशवी हलवित परत निघाल्या. ७० फूट रोडवरील गर्दीत भाजी खरेदी करण्यापेक्षा या ठिकाणी सुरक्षितपणे खरेदी करता येईल, अशी प्रतिक्रिया द्यायला मात्र त्या विसरल्या नाही.
- शंकर वडनाल म्हणाले, चिप्पा भाजी मंडई सर्वांच्या सोयीची असल्याने व रहदारीस कोणताही अडथळा येथे नसल्याने येथेच भाजी मंडई भरवली जावी. सवय होईपर्यंत विक्रेते आणि ग्राहक दोघांनाही त्रास होईल, मात्र या ठिकाणासारखी सुरक्षितता रस्त्यावर नाही. 

Web Title: New Chipa Mandai has been found in Solapur, dew, and still sellers of 'seventy feet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.