सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीवर नवे कारभारी
By Admin | Published: March 14, 2017 04:40 PM2017-03-14T16:40:50+5:302017-03-14T16:40:50+5:30
सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीवर नवे कारभारी
सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीवर नवे कारभारी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडी झाल्या असून पंचायत समितीला नवे कारभारी मिळाले आहेत़ कुठे चुरस तर कुठे बिनविरोधांमुळे निवडी शांततेत पार पाडल्या़ मोहोळ पंचायत समितीचा कौल मात्र चिठ्ठीवर घेतला गेला़
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकांसाठी २१ फेबु्रवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली़ त्यानंतर २३ फेबु्रवारी रोजी मतमोजणी झाली़ जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीवर भाजपाने सत्ता मिळविली़ यात राष्ट्रवादी व काँग्रेसला काही ठिकाणी यश मिळविता आले़ काही पंचायत समितीवर आघाड्यांनी बाजी मारली़ मंगळवार १४ मार्च रोजी संबंधित तालुका पंचायत समिती कार्यालयात सभापती व उपसभापतींच्या निवड पाड पाडल्या़ सकाळी ११ वाजता इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले़ त्यानंतर निवडी करण्यात आल्या़ निवडीनंतर उपस्थित उमेदवारांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुक काढून जल्लोष केला़
सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय सभापती व उपसभापती
माढा.........
सभापती : विक्रमसिंह बबनराव शिंदे
उपसभापती : बाळासाहेब तुकाराम शिंदे
सांगोला...........
सभापती : मायाक्का मायाप्पा यमगर
उपसभापती : शोभा बाबासाहेब खटकाळे
माळशिरस............
सभापती : वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते-पाटील
उपसभापती : किशोर शिवाजी सुळ
पंढरपूर...........
सभापती : दिनकर शंकर नाईकनवरे
उपसभापती : अरूण ज्ञानोबा घोलप
दक्षिण सोलापूर..........
सभापती : ताराबाई शिरीष पाटील
उपसभापती : संदीप अमृत टेळे
अक्कलकोट...........
सभापती : सुरेखा मल्लिकार्जुन काटगांवकर
उपसभापती : प्रकाश मल्लिकार्जुन हिप्परगी
बार्शी ...........
सभापती : कविता विनोद वाघमारे
उपसभापती : अविनाश भारत मांजरे
मोहोळ ..............
सभापती : समता माणिक गावडे
उपसभापती : साधना दिनकर देशमुख
उत्तर सोलापूर............
सभापती : संध्याराणी इंद्रजित पवार
उपसभापती : रजनी संभाजी भडकुंबे
करमाळा .............
सभापती : शेखर सुब्राव गाडे
उपसभापती : गहिनीनाथ चंद्रसेन ननवरे
मंगळवेढा ...............
सभापती : प्रदीप वसंत खांडेकर
उपसभापती : विमल सुर्यकांत पाटील