‘लोकमत’च्या वृत्तानंतर पोलीस आयुक्तांनी बोलाविली नवीपेठ व्यापाऱ्यांची बैठक
By Appasaheb.patil | Published: November 26, 2019 12:52 PM2019-11-26T12:52:38+5:302019-11-26T13:00:34+5:30
नवी पेठेचा कायापालट होणार.. पोलीस आयुक्तांचा आराखडा तयार, पोलीस आयुक्तालयात झाली बैठक, व्यापाऱ्नायांना साथ देण्याचे आवाहन
सोलापूर : नवीपेठ ही शहरातील मुख्य बाजारपेठ आहे़ सोलापूर शहरात आलेल्या प्रत्येकाला नवीपेठमध्ये पाऊल ठेवले की, आनंद वाटला पाहिजे़ खरेदी वाढली पाहिजे, जेणेकरून सोलापूरचे सकारात्मक ब्रँडिंग होईल अन् येथील व्यापार वाढेल, हाच प्रामाणिक प्रयत्न असणार आहे़ नवीपेठच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस, महापालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना आखल्या जातील, त्याला व्यापाºयांनी साथ दिली पाहिजे. नवीपेठतील वाहतूक, सुरक्षा आदी समस्या सोडविण्यासाठीचा आराखडा पोलिसांकडून तयार करण्यात आला असून, तो महापालिकेच्या मदतीने टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचीही माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
‘लोकमत’ने नवीपेठ नव्हे छे.. छे.. ही तर समस्यापेठ या मथळ्याखाली नवीपेठेतील व्यापाºयांच्या समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर पोलीस अधिकाºयांनी पाहणी करून उपाययोजना करण्याबाबतचा अहवाल सादर केला आहे़ या अहवालावर चर्चा करण्यासाठी सोमवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयुक्तालयात नवीपेठ व्यापाºयांची बैठक पार पडली. या बैठकीस सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) डॉ. वैशाली कडूकर, पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील, बाळासाहेब भालचिम यांच्यासह नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, खुशाल देढिया, विजय पुकाळे, माणिक गोयल, मोबाईल गल्ली व्यापारी असोसिएशनचे अशोक आहुजा, भाविन रांभिया, आनंद बनवाणी, अभय जोशी यांच्यासह शेकडो व्यापारी उपस्थित होते.
नो व्हेईकल झोन नको...पार्किंगची सुविधा उपलब्ध करा
- नवीपेठ परिसर हा नो व्हेईकल झोन केला तर येथील व्यापार मोडीत निघेल़ शिवाय बाजारात ग्राहकांचे येण्याचे प्रमाण कमी होईल, त्यामुळे नवीपेठ परिसरात नो व्हेईकल झोन करण्यापेक्षा येथे असलेली पार्किंगची सर्व स्थळे खुली करून येणाºया ग्राहकांना गाड्या लावण्यासाठी मोकळ्या करून द्याव्यात़ आसार मैदान ते किल्ला बागेपर्यंत चारचाकी वाहनांना पार्किंगची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापाºयांनी केल्याची माहिती नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी दिली़
या ठिकाणी होईल पार्किंगची व्यवस्था...
- - पारस इस्टेट
- - जुनी मनपा इमारत परिसर
- - इंदिरा प्रशाला
- - सनप्लाझा इमारतीची खालची बाजू
- - लालबहादूर शॉपिंग सेंटर
- - जनता शॉपिंग सेंटर
- - भगवानदास शॉपिंग सेंटर
गल्लीबोळातील अतिक्रमणे हटवा...
- नवीपेठेतील बहुतांश गल्लीबोळात बंद पडलेली दुकाने, हातगाड्या, लहान-मोठे खोके तसेच पडून आहेत़ या पडलेल्या खोक्यांमुळे रहदारीला व पार्किंगला अडथळा निर्माण होत आहे़ ही पडीक खोकी, दुकाने त्वरित हटविल्यास त्या जागांचा वापर पार्किंगसाठी करता येईल, जेणेकरून नवीपेठेतील वाहतुकीची समस्या सोडवण्यास हातभार लागेल, असेही व्यापाºयांनी पोलिसांना सुचविले असल्याचे नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे खुशाल देढिया यांनी सांगितले़
कर्मचाºयांना हेल्मेट दान करा..
- अपघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक दुचाकी वाहनधारकाने हेल्मेट घालणे काळाची गरज आहे़ त्यादृष्टीने शहरात हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती व प्रचार, प्रसार सुरू आहे़ नवीपेठेतील सर्वच व्यापाºयांनी आपल्या दुकानात असलेल्या सर्वच कर्मचाºयांना हेल्मेट दान करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी यावेळी केले़ शिवाय हेल्मेट जनजागृती मोहिमेत व्यापाºयांनी पोलिसांना मदत करावी, असेही आवाहन केले.
अनधिकृत हॉकर्सवर कारवाई करणार..
- नवीपेठेत बहुतांश हॉकर्स (हातगाडी) चालक हे अनधिकृत आहेत. या अनधिकृत हॉकर्सवर लवकरच कारवाई करू. शिवाय अधिकृत हातगाडीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील यांनी सांगितले.
पुन्हा बैठक घेऊ
- पोलीस आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीत बहुतांश प्रश्न महापालिकेच्या अखत्यारित होते. त्यामुळे महापालिकेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना व निर्णय घेणारे अधिकारी उपस्थित नव्हते़ त्यामुळे महापालिका आयुक्त दीपक तावरे यांच्यासोबत पुन्हा बैठक घेऊन पुढील निर्णय घेऊ, असेही पोलिसांनी सांगितले़