मजरेवाडी, शेळगी, रामवाडी, सोरेगाव भागात कोरोनाचे नवे रुग्ण
By दिपक दुपारगुडे | Published: April 12, 2023 04:36 PM2023-04-12T16:36:16+5:302023-04-12T16:36:41+5:30
शहराची रुग्णसंख्या पोहोचली ४६ वर, कमी वयातील रुग्णच अधिक
सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालावरून पाच रुग्ण वाढले आहेत. मजरेवाडी, रामवाडी, साबळे, शेळगी, सोरेगाव नागरी आरोग्य केंद्र परिसरातील हे पाच रुग्ण आहेत. सोलापुरातील रुग्णसंख्या ४६ वर पोहोचली आहे.
दरम्यान, मंगळवारी ७२ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, त्यापैकी ६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. १६ ते ३० वयोगटातील २, ३१ ते ५० वयोगटातील २, तर ६० पेक्षा जास्त वयोगट असलेले एका रुग्णाचा समावेश आहे. ४६ रुग्णांपैकी १२ पुरुष तर १४ महिला रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या ३४ हजार ७३१ एवढी असून मृतांची संख्या १ हजार ५१९ एवढी आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ३३ हजार १६६ एवढी आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्कचा वापर करा, लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात भेट द्या, कोणताही आजार अंगावर काढू नका, असे आवाहन वैद्यकीयतज्ज्ञांनी केले आहे.