सात गावांत होणार नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:21+5:302021-07-21T04:16:21+5:30
यामध्ये आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करणे, उपकरणे, यंत्रसामुग्री, वीज, पाणी आदी बाबींचा समावेश आहे, हा निधी आशिया विकास बँकेकडून ...
यामध्ये आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम करणे, उपकरणे, यंत्रसामुग्री, वीज, पाणी आदी बाबींचा समावेश आहे, हा निधी आशिया विकास बँकेकडून ७० टक्के व राज्य शासनाकडून ३० टक्के निधी मंजूर केला आहे. मंगळवेढा तालुक्यातील सात प्राथमिक अरोग्य उपकेंद्राला मंजूर अनुदान प्राप्त करण्यासाठी उपकेंद्राचे अंदाज व आराखडे शासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. या अंदाज व आराखड्यामध्ये मुख्य इमारत, निवास व्यवस्था, फर्निचर, साहित्य सामुग्री, वीज, पाणी, कम्पाउंड, अंतर्गत रस्ते या सर्व बाबींचा समावेश असावा, असे नमूद केले आहे.
यासाठी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, झेडपी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, समाज कल्याणच्या माजी सभापती शीला शिवशरण, झेडपी सदस्या मंजुळा कोळेकर, पं. स. सभापती प्रेरणा मासाळ, उपसभापती सूर्यकांत ढोणे, माजी सभापती प्रदीप खांडेकर, माजी उपसभापती विमल पाटील, पं. स. सदस्य उज्ज्वला मस्के यांनी पाठपुरावा केला होता.