नूतन प्रशालेतील लिपिक मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापकास अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:43 PM2021-03-05T12:43:24+5:302021-03-05T12:43:28+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग...
सोलापूर - नुतून प्रशाला, सोलापूर येथील लिपिक गुंडुराव बोनदार्डे याच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेले तत्कालीन मुख्याध्यापक नंदकुमार सावळे (वय ५८, रा. सोलापूर ) यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौ आर. व्ही. मोहिते यांच्या समोर होऊन मुख्याध्यापकाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.
लिपिक गुंडूराव बोनदार्डे यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नी रेखा यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे दि 11.02.2021 रोजी दिलेल्या फिर्यादीत मुख्याध्यापक नंदकुमार सावळे व इतर शाळेतल्या पदाधिकाऱ्यांनी फिर्यादीच्या पतीला मानसिक त्रास दिला. सेवा ज्येष्ठतेबद्दल अन्याय केला तसेच मानसिक छळ केला. सदर त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत केला होता. या आरोपावरून मुख्याध्यापक नंदकुमार सावळे व इतर पदाधिकार्यविरुद्ध इ.पि.को. 306 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
मुख्याध्यापक नंदकुमार सावळे यांनी लिपिक बोनदारडे याना कधीही त्रास दिला नाही. फिर्यादी मध्ये केलेल्या आरोपावरून इ.पि.को. 306 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा निष्पन्न होत नाही असा युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी मुख्याध्यापक सावळे यांच्या तर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे, ॲड. सोमनिंग पुजारी यांनी तर सरकारपक्षातर्फे ॲड. दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.