हरित शपथ देऊन नवीन वर्षाची केली सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:40+5:302021-01-04T04:19:40+5:30
यावेळी नगराध्यक्षा राणी माने, आरोग्य सभापती छाया मेटकरी, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, आरोग्य निरीक्षक संजय ...
यावेळी नगराध्यक्षा राणी माने, आरोग्य सभापती छाया मेटकरी, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे, शहर समन्वयक शिवाजी सांगळे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पर्यावरण पूरक हरित शपथ घेतली.
यावेळी शहरातील विविध महिला बचत गट आणि विद्यामंदिर प्रशाला व उत्कर्ष विद्यालयमधील विद्यार्थ्यांना मी माझे घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवीन, निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण व संवर्धन करेन, पर्यावरणपूरक व निसर्गपूरक जीवनपद्धतीचा अवलंब करेल, माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग नोंदविणे व पर्यावरण सप्तपदीचे पालन करणे, स्वच्छ सुंदर हरित व पर्यावरणपूरक वसुंधरा राखण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशी शपथ घेण्यात आली.
कोट ::::::::::::::
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत वृक्ष लागवड करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, सौरऊर्जेच्या वापर करणे, पाण्याची बचत करणे, ओल्या कचऱ्यावर घरच्या घरी प्रक्रिया करण्यास नागरिकांना प्रोत्साहन देणे या सर्व बाबी नजीकच्या काळात व्यापक प्रमाणावर केल्या जाणार आहेत.
- राणी माने, नगराध्यक्षा