नव्या वर्षात पंढरीत विकासकामांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:16 AM2021-01-01T04:16:03+5:302021-01-01T04:16:03+5:30
पंढरपुरातील यमाई तुकाई तलावाजवळ तुळशी वृंदावन तयार करण्यात आले आहे. यामुळे बाहेरगावावरून विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ही पर्वणी आहे. ...
पंढरपुरातील यमाई तुकाई तलावाजवळ तुळशी वृंदावन तयार करण्यात आले आहे. यामुळे बाहेरगावावरून विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ही पर्वणी आहे. नव्या वर्षा तलावाच्या संपूर्ण ट्रेकवर पेव्हिंग ब्लॉक टाकण्यात येणार आहे. नाना - नानी पार्क, खुली व्यायामशाळा व आयलँड करून बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटी रुपये मंजूर आहेत.
४० रस्त्यांसाठी १४५ कोटी
शहरातील ४० रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामासाठी १४५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये प्रदक्षिणा मार्ग व उपनगरातील महत्त्वाच्या रस्त्यांचा सहभाग आहे.
तसेच पंढरपुरातील जलशुद्धिकरणाची क्षमता वाढविण्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर आहे. जलशुद्धिकरण केंद्राचे कामदेखील या वर्षात मार्गी लागणार असल्याचे मुख्याधिकारी अनिकेत मानकर यांनी सांगितले.
विठ्ठलाच्या परिवार देवतांच्या मंदिरांची पुनर्बांधणी
विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी मंडप बांधणे, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील फरशी बदलणे, देवतामधील चार मंदिरांची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.