सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळलं नवजात अर्भक
By रूपेश हेळवे | Published: December 13, 2022 01:24 PM2022-12-13T13:24:37+5:302022-12-13T13:25:04+5:30
ते नवजात शिशु हे पुरुष जातीचे असून ते नुकतेच जन्मले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद हॉस्पिटलमध्ये होत आहे.
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या समोरील कचराकुंडीत मंगळवारी सकाळी कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये नवजात शिशु आढळला. हा नवजात शिशु एक ते दोन दिवसाचा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याची सुमारास कचरा वेचणारी एक महिला हॉस्पिटलच्या समोरील बाजूस असलेल्या कचराकुंडीत कचरा वेचत होती. तेव्हा तिला एका कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये ते नवजात शिशु आढळला. याची माहिती तिने सुरक्षारक्षकांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. दरम्यान, ते नवजात शिशु हे पुरुष जातीचे असून ते नुकतेच जन्मले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद हॉस्पिटलमध्ये होत आहे. घटनास्थळी जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे दाखल झाले आहेत.