ऊर्जा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले नव कुमार सिन्हा सोलापूर एनटीपीसीचे नवे समूह महाप्रबंधक, आज पदभार स्वीकारला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 02:11 PM2018-02-12T14:11:34+5:302018-02-12T14:13:32+5:30
थर्मल, गॅस आणि सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात तब्बल ३६ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नव कुमार सिन्हा यांनी सोमवार १२ फेबु्रवारी रोजी फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रोजेकटच्या समूह महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२ : थर्मल, गॅस आणि सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात तब्बल ३६ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नव कुमार सिन्हा यांनी सोमवार १२ फेबु्रवारी रोजी फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रोजेकटच्या समूह महाप्रबंधक पदाचा पदभार स्वीकारला.
एन एन रॉय यांची बदली झाल्यापासून सोलापूर प्रोजेकटचे पद रिक्त होते. दीर्घकालीन प्रतिक्षेनंतर एन के सिन्हा यांची या पदावर बदली झाली असून त्यांनी प्रभारी महाप्रबंधक देव व्रत यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी एनटीपीसीचे प्रमुख अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
विशाखापट्टणम नजीक सिंहाद्री येथील १००० मेगावॅट थर्मल पॉवर प्रकल्पात समूह महाप्रबंधक पदावरून त्यांना सोलापुरात आणण्यात आले आहे. यापूर्वी फराक्का ( पं. बंगाल), काहलगाव (बिहार), रामगुंडम ( तेलंगणा ) येथील थर्मल पॉवरमध्ये त्यांनी काम पाहिले आहे. १९८१ साली मेकॅनिकल पदवी धारण केल्यानंतर एनटीपीसी मध्ये दाखल झालेल्या सिन्हा यांच्या गाठी तब्बल २६ वर्षाचा समृद्ध आणि प्रदीर्घ अनुभव आहे. कुडगी ( विजयपूर ) येथे नव्याने उभारलेल्या थर्मल पॉवरची संपूर्ण उभारणी त्यांच्या देखरेखीखाली झाली आहे.